S M L

शास्त्रीजींना देशभर आदरांजली

2 ऑक्टोबरस्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज 106 वी जयंती आहे. नेहरूंनंतर राष्ट्राचा गाडा हाकणारे ते एक सक्षम पंतप्रधान...देशासह जगभरात शास्त्रीजी ओळखले जातात ते त्यांच्या जय जवान आणि जय किसान या शेतकर्‍यांशी सैनिकाचे नाते सांगणार्‍या लोकप्रिय घोषणेमुळे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे गांधीजींचे तत्वज्ञान प्रत्यक्षात जगणारा हा धैर्यशील पंतप्रधान. भलेही गरिबीत जगू पण आमच्या स्वातंत्र्याला धक्का लागू देणार नाही, असे जगाला ठणकावून सांगणारे शास्त्रीजी व्यक्तिगत जीवनात जातिभेदाला मूठमाती देणारे होते.पाकिस्तानने काढलेली कागाळी भारतीय सैन्याने 1965 मध्ये त्यांच्याच कार्यकाळात ठेचून काढली..तसेच चीनच्या मुजोरीलाही शास्त्रीजींनी त्यावेळी जशास तसे उत्तर दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 10:52 AM IST

शास्त्रीजींना देशभर आदरांजली

2 ऑक्टोबर

स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज 106 वी जयंती आहे.

नेहरूंनंतर राष्ट्राचा गाडा हाकणारे ते एक सक्षम पंतप्रधान...देशासह जगभरात शास्त्रीजी ओळखले जातात ते त्यांच्या जय जवान आणि जय किसान या शेतकर्‍यांशी सैनिकाचे नाते सांगणार्‍या लोकप्रिय घोषणेमुळे.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे गांधीजींचे तत्वज्ञान प्रत्यक्षात जगणारा हा धैर्यशील पंतप्रधान. भलेही गरिबीत जगू पण आमच्या स्वातंत्र्याला धक्का लागू देणार नाही, असे जगाला ठणकावून सांगणारे शास्त्रीजी व्यक्तिगत जीवनात जातिभेदाला मूठमाती देणारे होते.

पाकिस्तानने काढलेली कागाळी भारतीय सैन्याने 1965 मध्ये त्यांच्याच कार्यकाळात ठेचून काढली..तसेच चीनच्या मुजोरीलाही शास्त्रीजींनी त्यावेळी जशास तसे उत्तर दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close