S M L

वस्त्रहरण सादर होणार कॉमनवेल्थमध्ये

2 ऑक्टोबरअजय परचुरे, मुंबई वस्त्रहरण हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक माईलस्टोन. 5 हजार प्रयोग पूर्ण करणारे रंगभूमीवरील वस्त्रहरण हे एकमेव नाटक. वस्त्रहरणच्या शिरपेचात आता अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सनिमित्त संगीत नाटक अकादमीने नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यात वस्त्रहरण नाटकाची निवड करण्यात आली आहे. वस्त्रहरण नाटकाचा हा मालवणी तडका आता दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनुभवायला मिळणार आहे. मच्छिंद्र कांबळींनी आपल्या अस्सल मालवणी भाषेची गोडी रसिकांना अनुभवायली दिली. तीच गोडी आता कॉमनवेल्थमध्ये आलेल्या परदेशी खेळांडूंना सुध्दा चाखायला मिळणार आहे. संगीत नाट्य अकादमीने आयोजित केलेल्या या नाट्यमहोत्सवात देशातील नामवंत नाटककारांची नाटकेही सादर होणार आहेत. परदेशी खेळाडूंना या नाटकाचा अर्थ कळावा, यासाठी महोत्सवात खास योजनाही करण्यात आली आहे. रंगभूमीवर 5 हजार प्रयोग पूर्ण करणार्‍या वस्त्रहरण नाटकाला कॉमनवेल्थमध्ये प्रयोग करायला मिळाला ही भद्रकाली प्रॉडक्शन आणि मराठी रंगभूमीसाठी गौरवाची गोष्ट आहे. हा प्रयोग दिल्लीला 10 ऑक्टोबरला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 11:17 AM IST

वस्त्रहरण सादर होणार कॉमनवेल्थमध्ये

2 ऑक्टोबर

अजय परचुरे, मुंबई

वस्त्रहरण हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक माईलस्टोन. 5 हजार प्रयोग पूर्ण करणारे रंगभूमीवरील वस्त्रहरण हे एकमेव नाटक.

वस्त्रहरणच्या शिरपेचात आता अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सनिमित्त संगीत नाटक अकादमीने नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यात वस्त्रहरण नाटकाची निवड करण्यात आली आहे.

वस्त्रहरण नाटकाचा हा मालवणी तडका आता दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनुभवायला मिळणार आहे. मच्छिंद्र कांबळींनी आपल्या अस्सल मालवणी भाषेची गोडी रसिकांना अनुभवायली दिली. तीच गोडी आता कॉमनवेल्थमध्ये आलेल्या परदेशी खेळांडूंना सुध्दा चाखायला मिळणार आहे.

संगीत नाट्य अकादमीने आयोजित केलेल्या या नाट्यमहोत्सवात देशातील नामवंत नाटककारांची नाटकेही सादर होणार आहेत. परदेशी खेळाडूंना या नाटकाचा अर्थ कळावा, यासाठी महोत्सवात खास योजनाही करण्यात आली आहे.

रंगभूमीवर 5 हजार प्रयोग पूर्ण करणार्‍या वस्त्रहरण नाटकाला कॉमनवेल्थमध्ये प्रयोग करायला मिळाला ही भद्रकाली प्रॉडक्शन आणि मराठी रंगभूमीसाठी गौरवाची गोष्ट आहे. हा प्रयोग दिल्लीला 10 ऑक्टोबरला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close