S M L

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रेनिंग घेतल्याचं उघड

28 ऑक्टोबर, नागपूरमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांचा स्फोटांशी संबंध असल्याबाबत एटीएसनं तपास सुरू केला आहे. दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2001 मध्ये नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे व्यक्तिमत्व विकास शिबिर होतं, असं स्पष्टीकरण शाळेनं दिलं आहे.मिलिटरी स्कूलचे संचालक सतीश सालफेकर यांनी याबाबत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी एटीएसनं त्यांच्याकडे चौकशी करत बजरंग दलाच्या प्रशिक्षण शिबिरांची माहिती घेतली होती. मात्र त्यानंतर एटीएसनं आमच्याशी काहीही संपर्क साधला नाही, असं स्पष्टीकरणही साल्फेकर यांनी दिलं. नागपूरची भोसला मिलिटरी स्कूल ही नाशिकच्याच भोसला मिलीटरीची शाखा आहे. नांदेडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर एटीएसनं हिंदुत्ववादी संघटनांवर बारीक नजर ठेवणं सुरू केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांसदर्भात हिंदुत्ववादी संघटनांना मदत करणार्‍या दोन निवृत्त लष्करी अधिकार्‍यांसह, एक मेजर आणि एका कॅप्टनलाउद्या नाशिकच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. समीर कुळकर्णी आणि रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय अशी त्या अधिकार्‍यांची नावे आहेत. यासंदर्भात 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाईल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेल्या बजरंग दलाच्या बहुचर्चित शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून कॅ. शरदकुमार भाटे उपस्थित होते. त्यांनीएटीएस ला दिलेल्या माहितीची प्रत आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी मिळवली. त्यात दिलेल्या माहितीनुसार हे 40 दिवसांचे शिबिर होते. या शिबिरासाठी आरएसएसनं दिल्ली, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि दिल्ली इथल्या 115 जणांना आमंत्रीत केलं होतं. या शिबिरासाठी दोन रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि एक इंटेलिजंट एजन्सीचा रिटायर्ड ऑफिसर उपस्थित होता. मात्र या शिबिरामध्ये मुलांना अयोग्य गोष्टींचं प्रशिक्षणदेण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानं आपण हे शिबिर कालावधीआधीच सोडून आल्याचं कॅ. शरदकुमार भाटे यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 12:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close