S M L

कल्याण डोंबिवलीत समस्या कचर्‍याची

4 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला रंग चढू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत सध्या असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे साठलेला कचरा. या कचर्‍यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. कल्याण - डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम 1600 कर्मचारी करतात. त्याचबरोबर 80 घंटागाड्यादेखील या कामी लावण्यात आल्या आहेत.दर दिवशी 500 मेट्रीक टन कचरा महापालिका क्षेत्रातून उचलला जातो आणि तो कचरा आधारवाडी येथील डंपींग ग्राउंडवर टाकला जातो. या डंपींग ग्राऊंडची क्षमता संपल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे डंपींग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश दिलेत. शिवाय इथल्या कचर्‍याचा पर्यायी वापरही पालिका करत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 12:03 PM IST

कल्याण डोंबिवलीत समस्या कचर्‍याची

4 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला रंग चढू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत सध्या असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे साठलेला कचरा. या कचर्‍यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.

कल्याण - डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम 1600 कर्मचारी करतात. त्याचबरोबर 80 घंटागाड्यादेखील या कामी लावण्यात आल्या आहेत.

दर दिवशी 500 मेट्रीक टन कचरा महापालिका क्षेत्रातून उचलला जातो आणि तो कचरा आधारवाडी येथील डंपींग ग्राउंडवर टाकला जातो.

या डंपींग ग्राऊंडची क्षमता संपल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे डंपींग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश दिलेत. शिवाय इथल्या कचर्‍याचा पर्यायी वापरही पालिका करत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close