S M L

मुख्यमंत्री झाले अशोक'राव'

4 ऑक्टोबरनावात काय आहे... असे शेक्सपिअरने म्हटले आहे. नावात नसल तरी, 'रावा'तच सर्वकाही असल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना झाला आहे. मुख्यमंत्री पदाच्या दुसर्‍या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण होत असताना, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अशोक या नावामागे अधिकृतपणे 'राव' ही बिरुदावली लावून घेतली आहे. अशोक चव्हाण नावाच्या पाट्या आता अशोक'राव' चव्हाण अशा झाल्या आहेत. वर्षा हे सरकारी निवासस्थान असो किंवा मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, या सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपले नामकरण अशोकराव चव्हाण असे करून घेतले आहे. एवढेच नाही तर यापुढे आपला उल्लेख अशोकराव चव्हाण असाच करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना दिले आहेत. ज्योतिष्याच्या सल्ल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावात बदल केल्याचे समजते. कुठे आबा, तर कुठे दादा, तर कुठे राव या मांदियाळीत आपलेही नाव वरचढ ठरावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाचा सल्ला घेऊन आपल्या नावापुढे हा 'राव' जोडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 01:07 PM IST

मुख्यमंत्री झाले अशोक'राव'

4 ऑक्टोबर

नावात काय आहे... असे शेक्सपिअरने म्हटले आहे. नावात नसल तरी, 'रावा'तच सर्वकाही असल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना झाला आहे.

मुख्यमंत्री पदाच्या दुसर्‍या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण होत असताना, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अशोक या नावामागे अधिकृतपणे 'राव' ही बिरुदावली लावून घेतली आहे.

अशोक चव्हाण नावाच्या पाट्या आता अशोक'राव' चव्हाण अशा झाल्या आहेत.

वर्षा हे सरकारी निवासस्थान असो किंवा मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, या सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपले नामकरण अशोकराव चव्हाण असे करून घेतले आहे.

एवढेच नाही तर यापुढे आपला उल्लेख अशोकराव चव्हाण असाच करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

ज्योतिष्याच्या सल्ल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावात बदल केल्याचे समजते.

कुठे आबा, तर कुठे दादा, तर कुठे राव या मांदियाळीत आपलेही नाव वरचढ ठरावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाचा सल्ला घेऊन आपल्या नावापुढे हा 'राव' जोडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close