S M L

राहुल गांधीच्या आरएसएसवरील वक्तव्यावरून वाद

6 ऑक्टोबर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात चांगलेच तू तू मै मै रंगले आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागून वाद निर्माण आहे.बंदी घातलेली सिमी ही कट्टरवादी संघटना आणि संघ यांची विचारसरणी सारखीच आहे, असे म्हणून राहुल यांनी वादळ उभे केले आहे. संघ आणि भाजपनेही त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.भोपाळमध्ये युवा काँग्रेसच्या परिषदेत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर हल्ला चढवला. संघाची विचारसरणी मान्य नसल्याचे सांगतांना राहुलनी त्याची तुलना सीमी या बंदी घातलेल्या कट्टरवादी संघटनेशी केली. दोन्ही संघटना कट्टरवादी विचारसरणी पसरवतात, असे त्यांनी म्हटले आहे.राहुल यांच्या या वक्तव्यानंतर संघाने त्यांच्या विदेशी मुळावर हल्ला चढवला आहे. तर राहुल बालीश आहेत. काँग्रेसला मिळणार्‍या सततच्या अपयशामुळे ते हताश झाल्याचे भाजपने म्हटले आहे.सध्या पक्षापेक्षा युवा काँग्रेस बळकट करण्याकडे आपले लक्ष असल्याचे सांगणार्‍या राहुल यांनी थेट संघाच्या विचारसरणीवर हल्ला चढवून भाजपच्या मुळावर घाव घातला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:22 PM IST

राहुल गांधीच्या आरएसएसवरील वक्तव्यावरून वाद

6 ऑक्टोबर

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात चांगलेच तू तू मै मै रंगले आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागून वाद निर्माण आहे.

बंदी घातलेली सिमी ही कट्टरवादी संघटना आणि संघ यांची विचारसरणी सारखीच आहे, असे म्हणून राहुल यांनी वादळ उभे केले आहे. संघ आणि भाजपनेही त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

भोपाळमध्ये युवा काँग्रेसच्या परिषदेत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर हल्ला चढवला.

संघाची विचारसरणी मान्य नसल्याचे सांगतांना राहुलनी त्याची तुलना सीमी या बंदी घातलेल्या कट्टरवादी संघटनेशी केली. दोन्ही संघटना कट्टरवादी विचारसरणी पसरवतात, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल यांच्या या वक्तव्यानंतर संघाने त्यांच्या विदेशी मुळावर हल्ला चढवला आहे. तर राहुल बालीश आहेत. काँग्रेसला मिळणार्‍या सततच्या अपयशामुळे ते हताश झाल्याचे भाजपने म्हटले आहे.

सध्या पक्षापेक्षा युवा काँग्रेस बळकट करण्याकडे आपले लक्ष असल्याचे सांगणार्‍या राहुल यांनी थेट संघाच्या विचारसरणीवर हल्ला चढवून भाजपच्या मुळावर घाव घातला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close