S M L

जळगावात भूसंपादनात गैरव्यवहार

प्रशांत बाग, जळगाव6 ऑक्टोबरभूसंपादनाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या जमिनींबाबत जळगावमध्ये गैरव्यवहार होत आहेत. काही दलाल या गैरव्यवहारात शेतकर्‍यांना ओढत आहेत. एरंडोल तालुक्यातील भालगाव लघु प्रकल्पासाठी 2003 साली संपादीत केलेल्या जमिनीबाबत असाच प्रकार घडला आहे.येथील कासाबाई रामकिसन बिर्ला यांच्या संपादीत 2 हेक्टर 12 आर जमिनीचे सरकारी मूल्य आहे 42 हजार 836. पण सरकारी अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या जमिनीची नवीन किंमत आहे, 87 लाख 84 हजार 139. तसेच 2003 ला जमीन संपादित करताना या जमिनीवर एकही झाड नव्हते. पण एका वर्षानंतर मात्र त्याच जमिनीवर चक्क 1 हजार 756 झाडे असल्याचा साक्षात्कार कृषी विभागाला झाला.या प्रकरणाबद्दल आम्ही चौकशी केल्यावर जळगावच्याा भूसंपादन ऑफीस तातडीने कागदपत्रांची छाननी सुरु झाली. कासाबाई रामकिसन बिर्लांसह 19 जणांची उर्वरीत 35 टक्के रक्कम थांबविण्याचे आदेशही दिले. प्रकल्पासाठी सरकार जमीन घेणार हे समजताच पडेल भावाने येथील दलाल त्या विकत घेतात. आणि संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी संधान साधून आपली पोळी भाजतात. शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळत नाहीच आणि दलाल मात्र गब्बर होतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:33 PM IST

जळगावात भूसंपादनात गैरव्यवहार

प्रशांत बाग, जळगाव

6 ऑक्टोबर

भूसंपादनाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या जमिनींबाबत जळगावमध्ये गैरव्यवहार होत आहेत.

काही दलाल या गैरव्यवहारात शेतकर्‍यांना ओढत आहेत.

एरंडोल तालुक्यातील भालगाव लघु प्रकल्पासाठी 2003 साली संपादीत केलेल्या जमिनीबाबत असाच प्रकार घडला आहे.

येथील कासाबाई रामकिसन बिर्ला यांच्या संपादीत 2 हेक्टर 12 आर जमिनीचे सरकारी मूल्य आहे 42 हजार 836.

पण सरकारी अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या जमिनीची नवीन किंमत आहे, 87 लाख 84 हजार 139. तसेच 2003 ला जमीन संपादित करताना या जमिनीवर एकही झाड नव्हते.

पण एका वर्षानंतर मात्र त्याच जमिनीवर चक्क 1 हजार 756 झाडे असल्याचा साक्षात्कार कृषी विभागाला झाला.

या प्रकरणाबद्दल आम्ही चौकशी केल्यावर जळगावच्याा भूसंपादन ऑफीस तातडीने कागदपत्रांची छाननी सुरु झाली.

कासाबाई रामकिसन बिर्लांसह 19 जणांची उर्वरीत 35 टक्के रक्कम थांबविण्याचे आदेशही दिले.

प्रकल्पासाठी सरकार जमीन घेणार हे समजताच पडेल भावाने येथील दलाल त्या विकत घेतात.

आणि संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी संधान साधून आपली पोळी भाजतात.

शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळत नाहीच आणि दलाल मात्र गब्बर होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close