S M L

जलील अन्सारीला अटक

7 ऑक्टोबरमुंबईत झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये हात असलेल्या सय्यद मुसद्दिक कादरी उर्फ जलील अन्सारी याला एटीएसने अटक केली आहे. व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या जलील अन्सारी याने देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले होते. त्याने महाराष्ट्रात 35 बॉम्ब स्फोट केले होते. यापैकी मुंबई शहरात 21 आणि त्यापैकी 12 बॉम्बस्फोट रेल्वेत घडवले होते. कादरी याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी एका व्यक्तिचा खून केला आणि ती मयत व्यक्ती आपणच असल्याचे सिद्ध केले होते. त्यानंतर तो हैद्राबाद येथे गेला. तिथे तो अत्तरचा व्यापार करत होता. कादरी जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने बांगलादेशात जाऊन बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग घेतले होते. या सार्‍या पार्श्वभूमीवर कादरी हा स्लीपर सेल म्हणून काम करत असावा, असा एटीएसच्या अधिकार्‍यांना संशय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 10:39 AM IST

जलील अन्सारीला अटक

7 ऑक्टोबर

मुंबईत झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये हात असलेल्या सय्यद मुसद्दिक कादरी उर्फ जलील अन्सारी याला एटीएसने अटक केली आहे.

व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या जलील अन्सारी याने देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले होते.

त्याने महाराष्ट्रात 35 बॉम्ब स्फोट केले होते. यापैकी मुंबई शहरात 21 आणि त्यापैकी 12 बॉम्बस्फोट रेल्वेत घडवले होते.

कादरी याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी एका व्यक्तिचा खून केला आणि ती मयत व्यक्ती आपणच असल्याचे सिद्ध केले होते.

त्यानंतर तो हैद्राबाद येथे गेला. तिथे तो अत्तरचा व्यापार करत होता.

कादरी जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने बांगलादेशात जाऊन बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग घेतले होते.

या सार्‍या पार्श्वभूमीवर कादरी हा स्लीपर सेल म्हणून काम करत असावा, असा एटीएसच्या अधिकार्‍यांना संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close