S M L

नाशिकमध्ये होर्डिंग्जची तोरणे

7 ऑक्टोबरनाशिक शहरात सध्या राजकीय नेत्यांच्या होर्डिंग्जची तोरणे लागली आहेत. येत्या आठवड्यातील वाढदिवसांच्या निमित्ताने तीन आमदार आणि एका खासदाराची ही होर्डिंग्ज शहरभर झळकत आहेत. सध्या तुम्ही नाशिकमध्ये नव्याने आलात तर तुम्हाला रस्ते सापडणे थोडे अवघडच आहे. कारण दिशादर्शक फलकांवर तुम्हाला वेगळ्याच छब्या दिसतील. येत्या आठवड्यात नाशिकच्या 3 आमदारांचा आणि एका खासदाराचा वाढदिवस आहे. त्यांच्या होर्डिंग्जने नाशिकचे रस्ते भरून गेलेत. पाच वर्षांपूर्वी नाशिकच्या कर्नल गोडबोलेंनी होर्डिंगमुक्त नाशिक साठी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टानं पालिका आयुक्तांना 24 तासात होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. पण प्रत्यक्षात हा आदेश आणि ही कारवाई कागदावरच राहिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 10:44 AM IST

नाशिकमध्ये होर्डिंग्जची तोरणे

7 ऑक्टोबर

नाशिक शहरात सध्या राजकीय नेत्यांच्या होर्डिंग्जची तोरणे लागली आहेत.

येत्या आठवड्यातील वाढदिवसांच्या निमित्ताने तीन आमदार आणि एका खासदाराची ही होर्डिंग्ज शहरभर झळकत आहेत.

सध्या तुम्ही नाशिकमध्ये नव्याने आलात तर तुम्हाला रस्ते सापडणे थोडे अवघडच आहे.

कारण दिशादर्शक फलकांवर तुम्हाला वेगळ्याच छब्या दिसतील.

येत्या आठवड्यात नाशिकच्या 3 आमदारांचा आणि एका खासदाराचा वाढदिवस आहे.

त्यांच्या होर्डिंग्जने नाशिकचे रस्ते भरून गेलेत.

पाच वर्षांपूर्वी नाशिकच्या कर्नल गोडबोलेंनी होर्डिंगमुक्त नाशिक साठी जनहित याचिका दाखल केली होती.

त्यानंतर कोर्टानं पालिका आयुक्तांना 24 तासात होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते.

पण प्रत्यक्षात हा आदेश आणि ही कारवाई कागदावरच राहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close