S M L

शहेनशहाचा आज वाढदिवस

11 ऑक्टोबरबॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज 68 वा वाढदिवस. मुंबईतील त्यांच्या जुहूमधील प्रतीक्षा या बंगल्याबाहेर रात्रीपासूनच फॅन्सनी गर्दी केली होती. अमिताभना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांचे हजारो फॅन्स प्रतिक्षा बाहेर जमतात. यावेळीही बिग बींना शुभेच्छा देणारे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आलेत. देशातील निरनिराळ्या राज्यातून आलेल्या बिग बीच्या फॅन्सनी यावेळी प्रतिक्षा बंगल्याच्या बाहेर गाणी म्हणत बिग बींना शुभेच्छा दिल्या. आज सकाळपासूनही प्रतिक्षाबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. सोनीकडून वाढदिवसाची तयारीबिग बी अमिताभ बच्चन यांचा 68 वा वाढदिवस एकदम स्पेशल आहे. कारण आजच केबीसीची नवी इनिंग सुरु होत आहे. सोनी टीव्हीवर केबीसीचा चौथा सीझन आजपासून सुरु होत आहे. याच निमित्ताने सोनीतर्फे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची खास तयारी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी जे.डब्ल्यू.मॅरियटमध्ये एका शानदार समारंभात बिग बी एक स्पेशल केक कापणार आहेत. हा केक आहे थेट केबीसी सेटच्याच आकाराचा. या केकचे वजनही आहे 68 किलो.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 11:05 AM IST

शहेनशहाचा आज वाढदिवस

11 ऑक्टोबर

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज 68 वा वाढदिवस. मुंबईतील त्यांच्या जुहूमधील प्रतीक्षा या बंगल्याबाहेर रात्रीपासूनच फॅन्सनी गर्दी केली होती.

अमिताभना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांचे हजारो फॅन्स प्रतिक्षा बाहेर जमतात. यावेळीही बिग बींना शुभेच्छा देणारे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आलेत.

देशातील निरनिराळ्या राज्यातून आलेल्या बिग बीच्या फॅन्सनी यावेळी प्रतिक्षा बंगल्याच्या बाहेर गाणी म्हणत बिग बींना शुभेच्छा दिल्या. आज सकाळपासूनही प्रतिक्षाबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे.

सोनीकडून वाढदिवसाची तयारी

बिग बी अमिताभ बच्चन यांचा 68 वा वाढदिवस एकदम स्पेशल आहे. कारण आजच केबीसीची नवी इनिंग सुरु होत आहे.

सोनी टीव्हीवर केबीसीचा चौथा सीझन आजपासून सुरु होत आहे. याच निमित्ताने सोनीतर्फे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची खास तयारी करण्यात आली आहे.

आज संध्याकाळी जे.डब्ल्यू.मॅरियटमध्ये एका शानदार समारंभात बिग बी एक स्पेशल केक कापणार आहेत.

हा केक आहे थेट केबीसी सेटच्याच आकाराचा. या केकचे वजनही आहे 68 किलो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close