S M L

दसरा मेळावा दणक्यात

17 ऑक्टोबरकोर्टाच्या आदेशाला धूप न घालता शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर मोठ्या दणक्यात पार पडला. तब्येत ठणठणीत झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी चौफर टोलेबाजी करत काँग्रेसवर खास ठाकरी शैलीत घणाघाती टीका केली. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्या एकाच स्टेजवर पाहायला मिळाल्या. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देऊन त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाचे स्वागत केले. अखेर बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाषण केले. त्यांचा आवाज पूर्वीसारखाच खणखणीत आणि दमदार होता. यावेळी त्यांनी काँग्रेस, राज्य-केंद्र सरकार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. नक्षलवाद, काश्मीरप्रश्न आणि दहशतवाद यावरही बाळासाहेब बोलले. शिवसेनेत घराणेशाहीला थारा नाही, असे सांगत उद्धव यांची कार्याध्यक्षपदी निवड राज ठाकरे यांनीच केली होती, असा गौप्यस्फोट केला.शिवसेनेचा दसरा मेळावा थाटामाटात पार पडला, मात्र त्यात हायकोर्टाच्या नियमांचे उल्लंघन झाले. हायकोर्टाने 50 डेसिबलची मर्यादा दिली असताना सेनेची डरकाळी 87 डेसिबलपर्यंत गेली. 'आवाज फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेने ही चाचणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 05:39 PM IST

दसरा मेळावा दणक्यात

17 ऑक्टोबर

कोर्टाच्या आदेशाला धूप न घालता शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर मोठ्या दणक्यात पार पडला.

तब्येत ठणठणीत झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी चौफर टोलेबाजी करत काँग्रेसवर खास ठाकरी शैलीत घणाघाती टीका केली.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्या एकाच स्टेजवर पाहायला मिळाल्या.

सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देऊन त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाचे स्वागत केले.

अखेर बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाषण केले. त्यांचा आवाज पूर्वीसारखाच खणखणीत आणि दमदार होता.

यावेळी त्यांनी काँग्रेस, राज्य-केंद्र सरकार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.

नक्षलवाद, काश्मीरप्रश्न आणि दहशतवाद यावरही बाळासाहेब बोलले. शिवसेनेत घराणेशाहीला थारा नाही, असे सांगत उद्धव यांची कार्याध्यक्षपदी निवड राज ठाकरे यांनीच केली होती, असा गौप्यस्फोट केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा थाटामाटात पार पडला, मात्र त्यात हायकोर्टाच्या नियमांचे उल्लंघन झाले.

हायकोर्टाने 50 डेसिबलची मर्यादा दिली असताना सेनेची डरकाळी 87 डेसिबलपर्यंत गेली.

'आवाज फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेने ही चाचणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close