S M L

केरळमधल्या बेरोजगारीमुळे अनेक तरुण दहशतवादाकडे

29 ऑक्टोबर, केरळब्युरो रिपोर्टकाश्मीरमध्ये परवा लष्कराशी झालेल्या एन्काउन्टरमध्ये 4 अतिरेकी ठार झाले होते. त्यापैकी एक असलेला मोहम्मद फैय्याज हा केरळाचा होता.काश्मीरमधल्या अतिरेक्यांशी त्याचा संबध असल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण अतिरेक्यांच्या नादी लागत सल्याची धक्कादायक बाब यानिमित्तानं समोर आली आहे.देशभरात होत असलेल्या अतिरेकी कारवायांमध्ये केरळातल्या काही तरुणांचाही समावेश असल्याची बाब समोर येत आहे. या प्रकरणी कन्नौर मधून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद फैसल याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. केरळातल्या बेरोजगार तरुणांची मोठी फौज या कामासाठी वापरली जात असल्याचं त्याने सांगितलं.जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा पार करतांना परवा ठार झालेला मौदम्मद फैय्याजचे हा काश्मीरमधल्या एका मोठ्या अतिरेकी संघटनेशी लागेबंध होते.ही संघटना मोठ्या प्रमाणात केरळामधल्या तरुणांची यासाठी भरती करते.अब्दुल जब्बार यांच्या वडिलांची व्यथा बरीचं बोलकी आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा मुलगा त्यांना भेटलेला नाही. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अब्दुलनं लष्कराला चकमा देवून नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला. केरळ पोलिसांनी आता त्याच्या तपासाची मोहिम सुरु केली आहे.या प्रकरणी अधिक तपासाबाबत केरळ पोलिसांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. पण पैशांचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात या तरुणांना अतिरेकी संघटना आपल्याकडं आकर्षित करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.आता या प्रकरणी राज्य सरकारनं बुधवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यानंतरचं बर्‍याचं गोष्टींचा उलगडा होऊ शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2008 08:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2008 08:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close