S M L

तहसिलदारांवरील कारवाईच्या विरोधात आंदोलन

21 ऑक्टोबरकोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील तहसिलदार डॉ. संपत खिलारी यांच्यावर कारवाई करावी असे आदेश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते. या विरोधात आता महसूल कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पुणे आणि कोल्हापूर विभागातील जवळपास 25 हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. खिलारी यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यांच्या विरोधात काही राजकीय कार्यकर्त्यांनी खोट्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी राजकीय कारणातून कारवाईचे आदेश दिल्याचे राज्य तहसिलदार संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान आज बदलीच्या निषेधार्थ नागरिकांनी उस्फूर्तपणे कागल बंदचे आवाहन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 12:57 PM IST

तहसिलदारांवरील कारवाईच्या विरोधात आंदोलन

21 ऑक्टोबर

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील तहसिलदार डॉ. संपत खिलारी यांच्यावर कारवाई करावी असे आदेश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते. या विरोधात आता महसूल कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पुणे आणि कोल्हापूर विभागातील जवळपास 25 हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. खिलारी यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली होती.

त्यांच्या विरोधात काही राजकीय कार्यकर्त्यांनी खोट्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी राजकीय कारणातून कारवाईचे आदेश दिल्याचे राज्य तहसिलदार संघटनेचे म्हणणे आहे.

दरम्यान आज बदलीच्या निषेधार्थ नागरिकांनी उस्फूर्तपणे कागल बंदचे आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close