S M L

भंगार बाजार हटवण्याचा नाशिकमध्ये आदेश

21 ऑक्टोबरनाशिकच्या अंबड लिंक रोडवरचा अनधिकृत भंगार बाजार हटवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मात्र त्याला तीन महिने उलटून गेले तरी पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही. या ठिकाणी एक हजारांहून जास्त भंगाराची दुकाने आहेत. त्यापैकी 500 भंगार विक्रेत्यांना महापालिकेने वेळोवेळी नोटीसा पाठवल्या आहेत. पण तो फक्त देखावाच ठरला आहे. त्यापलिकडे महापालिकेने या अतिक्रमणाविरोधात काहीही केलेले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात हा परिसर अनधिकृत धंद्यांचे आश्रयस्थान बनला आहे. शिवसेनेचा इशारादरम्यान शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांची याबाबत भेट घेतली. भंगार बाजार हटवणे हे काम महापालिकेचे आहे. महापालिकेने 24 तासांची नोटीस दिल्यास पूर्ण बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची पोलिसांची तयारी आहे. आयुक्तांनी लवकरात लवकर भंगार बाजार हटवला नाही, तर शिवसेना आयुक्तांना हटवेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 01:07 PM IST

भंगार बाजार हटवण्याचा नाशिकमध्ये आदेश

21 ऑक्टोबर

नाशिकच्या अंबड लिंक रोडवरचा अनधिकृत भंगार बाजार हटवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मात्र त्याला तीन महिने उलटून गेले तरी पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही.

या ठिकाणी एक हजारांहून जास्त भंगाराची दुकाने आहेत. त्यापैकी 500 भंगार विक्रेत्यांना महापालिकेने वेळोवेळी नोटीसा पाठवल्या आहेत. पण तो फक्त देखावाच ठरला आहे. त्यापलिकडे महापालिकेने या अतिक्रमणाविरोधात काहीही केलेले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात हा परिसर अनधिकृत धंद्यांचे आश्रयस्थान बनला आहे.

शिवसेनेचा इशारा

दरम्यान शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांची याबाबत भेट घेतली. भंगार बाजार हटवणे हे काम महापालिकेचे आहे.

महापालिकेने 24 तासांची नोटीस दिल्यास पूर्ण बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची पोलिसांची तयारी आहे. आयुक्तांनी लवकरात लवकर भंगार बाजार हटवला नाही, तर शिवसेना आयुक्तांना हटवेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close