S M L

कल्याण डोंबिवलीत बससेवेचे तीन तेरा

22 ऑक्टोबरकल्याण डोंबिवलीच्या नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. कोलमडलेली परिवहन व्यवस्था ही एक गंभीर समस्या कल्याण डोंबिवलीकरांच्या माथी मारली गेली आहे. कल्याण डोंबिवली शहरातील बसेसची अवस्था ही कुठल्या तरी ग्रामीण भागातल्या आहे अशा प्रकारे झाली आहे. बसेसच्या दूर्देशवरूनच कल्याण डोबिवली मनपा बस व्यवस्थेबद्दल किती गंभीर आहे. तर परिवहन नियमानुसार आठ वर्षापेक्षा जुन्या गाड्या रस्त्यावर धावू शकत नाहीत. पण कल्याण डोंबिवली महापालिकेने हा परिवहन नियम धाब्यावर बसवले आहे. त्याचे कारण म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यातील गाड्या 10 वर्षापेक्षा जुन्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यात एकूण 140 बसेस आहेत. त्यापैकी 80 बसेस वापरण्यायोग्य नाही. कर्मचार्यांचा अभाव, नादुरूस्त बसेस आणि इतर कारणामुळे 30 टक्के बसेस उभ्या असतात. 25 बसेस या खासगी आहेत. त्यात भर म्हणून सात कर्मचारी युनियनमुळेही बस व्यवस्था कोलमडली आहे. या सर्व वाताहातीला सत्ताधारी जबाबदार आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियानाअंतर्गत कल्याण डोबिंवली महापालिकेला नवीन 100 बसेस घेण्यासाठी 100 कोटी रुपये अनुदान मिळत आहे. पण या बसेस आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पद आहे. एकंदरीतच परिवहन विभागाकडे सर्वच बाजूने दुर्लक्ष केले जात आहे. आता कल्याण डोंबिवली महापालिकेची बससेवा औरंगाबाद महापालिकेच्या मार्गावर जाईल का अशीही भिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 01:32 PM IST

कल्याण डोंबिवलीत बससेवेचे तीन तेरा

22 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. कोलमडलेली परिवहन व्यवस्था ही एक गंभीर समस्या कल्याण डोंबिवलीकरांच्या माथी मारली गेली आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील बसेसची अवस्था ही कुठल्या तरी ग्रामीण भागातल्या आहे अशा प्रकारे झाली आहे.

बसेसच्या दूर्देशवरूनच कल्याण डोबिवली मनपा बस व्यवस्थेबद्दल किती गंभीर आहे.

तर परिवहन नियमानुसार आठ वर्षापेक्षा जुन्या गाड्या रस्त्यावर धावू शकत नाहीत. पण कल्याण डोंबिवली महापालिकेने हा परिवहन नियम धाब्यावर बसवले आहे.

त्याचे कारण म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यातील गाड्या 10 वर्षापेक्षा जुन्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यात एकूण 140 बसेस आहेत. त्यापैकी 80 बसेस वापरण्यायोग्य नाही.

कर्मचार्यांचा अभाव, नादुरूस्त बसेस आणि इतर कारणामुळे 30 टक्के बसेस उभ्या असतात. 25 बसेस या खासगी आहेत.

त्यात भर म्हणून सात कर्मचारी युनियनमुळेही बस व्यवस्था कोलमडली आहे. या सर्व वाताहातीला सत्ताधारी जबाबदार आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियानाअंतर्गत कल्याण डोबिंवली महापालिकेला नवीन 100 बसेस घेण्यासाठी 100 कोटी रुपये अनुदान मिळत आहे.

पण या बसेस आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पद आहे. एकंदरीतच परिवहन विभागाकडे सर्वच बाजूने दुर्लक्ष केले जात आहे.

आता कल्याण डोंबिवली महापालिकेची बससेवा औरंगाबाद महापालिकेच्या मार्गावर जाईल का अशीही भिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close