S M L

तुळजाभवानीच्या दर्शनाला लोटला भक्तगण

22 ऑक्टोबरसोलापुरात कोजागिरी पोर्णिमेच्या मध्यरात्री आई तुळजाभवानीच्या दर्शनाला सर्वात मोठा छबिना निघतो. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातले देवीचे हजारो भक्त तुळजापूरकडे अनवाणी निघाले आहेत. दस-याचे सीमोल्लंघन झाल्यानंतर निदि्रस्त होणारी तुळजाभवानी, कोजागिरी पोर्णिमेला जागृत होते. यानिमित्त सोलापुरच्या रूपा भवानी मातेचे दर्शन घेऊन पायी वारी निघाली आहे. या वारीत लहान-मोठ्यांसह विविध मंडळांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत. सोलापूर ते तुळजापूर हे पन्नास किलोमीटरचे अंतर भाविक रात्रभर चालत पार करतात तरीही त्यांना थकवा जाणवत नसल्याचे भाविक म्हणतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 11:50 AM IST

तुळजाभवानीच्या दर्शनाला लोटला भक्तगण

22 ऑक्टोबर

सोलापुरात कोजागिरी पोर्णिमेच्या मध्यरात्री आई तुळजाभवानीच्या दर्शनाला सर्वात मोठा छबिना निघतो.

यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातले देवीचे हजारो भक्त तुळजापूरकडे अनवाणी निघाले आहेत.

दस-याचे सीमोल्लंघन झाल्यानंतर निदि्रस्त होणारी तुळजाभवानी, कोजागिरी पोर्णिमेला जागृत होते.

यानिमित्त सोलापुरच्या रूपा भवानी मातेचे दर्शन घेऊन पायी वारी निघाली आहे. या वारीत लहान-मोठ्यांसह विविध मंडळांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत.

सोलापूर ते तुळजापूर हे पन्नास किलोमीटरचे अंतर भाविक रात्रभर चालत पार करतात तरीही त्यांना थकवा जाणवत नसल्याचे भाविक म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close