S M L

कोची टीमला 30 दिवसांची मुदत वाद न मिटल्यास मान्यता रद्द !

27 ऑक्टोबरबीसीसीआयने कोची टीमला आता 30 दिवसांची मुदत दिली आहे. टीमच्या मालकी हक्कांवरुन सध्या टीम मालकांमध्ये वाद आहेत. आणि हे वाद या 30 दिवसांत मिटवण्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे. शिवाय टीमचे मालकी हक्क नव्याने उघड करण्याचे निर्देशही बीसीसीआयने दिलेत. कन्सोर्शियममधल्या तीन कंपन्या आयपीएल टीमचा ताबा सोडावा या मताच्या आहेत. तर गायकवाड बंधू वाद मिटवण्यासाठी बीसीसीआयकडून आणखी मुदत मागण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने नरमाईचे धोरण स्विकारायचे नाही असे ठरवले आहे. आणि तसे झाले तर कोची टीमसाठी येत्या जानेवारीत पुन्हा लिलाव होऊ शकतो. कोची टीमचा वादबीसीसीआयच्या आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोची टीमला आणखी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कोची टीम तयार होण्यापूर्वीच रद्द होणार का हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे. आणि त्यामुळे त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बीसीसीआयने त्यांना ही वाढीव मुदत दिली आहे. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोची टीम मालकांमध्ये असलेले वाद सध्या तरी मिटण्या पलिकडचे आहेत. रान्देवू स्पोर्ट्स ही टीम कन्सोर्शियममधली एक मुख्य कंपनी आहे. पण या कंपनीलाच कन्सोर्शियममध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध होतो. कन्सोर्शियममधल्या इतर कंपन्यांनी रान्देवूला टीमला मतदानाच्या हक्का शिवाय फक्त 20 टक्के वाटा देऊ केला आहे. शिवाय सुनंदा पुष्कर यांना स्वेट इक्विटी देण्यावरुन हा वाद मुळात सुरु झाला होता. या स्वेट इक्विटीतही रान्देवूला वाटा मिळणार नाही, असे इतर फ्रँचाईजी कंपन्यांनी त्यांना सांगितले आहे. रान्देवू स्पोर्ट्सला अर्थातच या तरतुदी मान्य नाही. त्यामुळे इतर कंपन्यांनी बीसीसीआयशी संपर्क साधून मालकी हक्कांची हिस्सेदारी बदलण्याची शिफारस केली आहे. यामध्ये खासकरुन सध्या रान्देवूकडे असलेल्या 26 टक्के हिश्शाचे फेरवाटप करण्याचा प्रस्ताव आहे. पण, आयपीएलच्या नियमांनुसार पहिली तीन वर्षं टीमचे मालकी हक्क बदलता येत नाहीत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत कोची टीमचा करार रद्द करण्याचा पर्याय बीसीसीआयसमोर उरतो. त्यामुळे आता पुढील 30 दिवसांत कोची टीम हा वाद सोडवते की बीसीसीआय टीम रद्द करण्याचा शेवटचा पर्याय वापरते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 11:43 AM IST

27 ऑक्टोबर

बीसीसीआयने कोची टीमला आता 30 दिवसांची मुदत दिली आहे. टीमच्या मालकी हक्कांवरुन सध्या टीम मालकांमध्ये वाद आहेत.

आणि हे वाद या 30 दिवसांत मिटवण्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे.

शिवाय टीमचे मालकी हक्क नव्याने उघड करण्याचे निर्देशही बीसीसीआयने दिलेत.

कन्सोर्शियममधल्या तीन कंपन्या आयपीएल टीमचा ताबा सोडावा या मताच्या आहेत.

तर गायकवाड बंधू वाद मिटवण्यासाठी बीसीसीआयकडून आणखी मुदत मागण्याचा प्रयत्न करत आहे.

पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने नरमाईचे धोरण स्विकारायचे नाही असे ठरवले आहे.

आणि तसे झाले तर कोची टीमसाठी येत्या जानेवारीत पुन्हा लिलाव होऊ शकतो.

कोची टीमचा वाद

बीसीसीआयच्या आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोची टीमला आणखी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कोची टीम तयार होण्यापूर्वीच रद्द होणार का हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे.

आणि त्यामुळे त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बीसीसीआयने त्यांना ही वाढीव मुदत दिली आहे.

पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोची टीम मालकांमध्ये असलेले वाद सध्या तरी मिटण्या पलिकडचे आहेत.

रान्देवू स्पोर्ट्स ही टीम कन्सोर्शियममधली एक मुख्य कंपनी आहे. पण या कंपनीलाच कन्सोर्शियममध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध होतो.

कन्सोर्शियममधल्या इतर कंपन्यांनी रान्देवूला टीमला मतदानाच्या हक्का शिवाय फक्त 20 टक्के वाटा देऊ केला आहे. शिवाय सुनंदा पुष्कर यांना स्वेट इक्विटी देण्यावरुन हा वाद मुळात सुरु झाला होता.

या स्वेट इक्विटीतही रान्देवूला वाटा मिळणार नाही, असे इतर फ्रँचाईजी कंपन्यांनी त्यांना सांगितले आहे.

रान्देवू स्पोर्ट्सला अर्थातच या तरतुदी मान्य नाही. त्यामुळे इतर कंपन्यांनी बीसीसीआयशी संपर्क साधून मालकी हक्कांची हिस्सेदारी बदलण्याची शिफारस केली आहे.

यामध्ये खासकरुन सध्या रान्देवूकडे असलेल्या 26 टक्के हिश्शाचे फेरवाटप करण्याचा प्रस्ताव आहे.

पण, आयपीएलच्या नियमांनुसार पहिली तीन वर्षं टीमचे मालकी हक्क बदलता येत नाहीत.

त्यामुळे प्राप्त परिस्थितीत कोची टीमचा करार रद्द करण्याचा पर्याय बीसीसीआयसमोर उरतो.

त्यामुळे आता पुढील 30 दिवसांत कोची टीम हा वाद सोडवते की बीसीसीआय टीम रद्द करण्याचा शेवटचा पर्याय वापरते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close