S M L

विठ्ठल- बिरदेव यात्रेला आजपासून सुरवात

27 ऑक्टोबरभैरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात, धनगरी ढोल आणि भंडाराच्या उधळणीत कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली इथल्या विठ्ठल- बिरदेव यात्रेला आजपासून सुरवात झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असणार्‍या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आध्रंप्रदेश, आणि उत्तर प्रदेश या ठिकाणाहून भक्तगण दाखल झाले आहे. आज प्रथेप्रमाणे गावचावडीमध्ये मानाच्या तलवारीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावक-यांनी भंडाराच्या उधळणीत फरांडेबाबांना आमंत्रण दिल. फरांडेबाबांनी आमंत्रण स्वीकारून तलवारीने स्वतःवर वार करत हेडाम नृत्य केले. यावेळी ढोलवादन आणि कैताळवादन अखंड चालू होते. या यात्रेला जवळपास दोन लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 04:09 PM IST

विठ्ठल- बिरदेव यात्रेला आजपासून सुरवात

27 ऑक्टोबर

भैरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात, धनगरी ढोल आणि भंडाराच्या उधळणीत कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली इथल्या विठ्ठल- बिरदेव यात्रेला आजपासून सुरवात झाली.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असणार्‍या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आध्रंप्रदेश, आणि उत्तर प्रदेश या ठिकाणाहून भक्तगण दाखल झाले आहे.

आज प्रथेप्रमाणे गावचावडीमध्ये मानाच्या तलवारीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावक-यांनी भंडाराच्या उधळणीत फरांडेबाबांना आमंत्रण दिल.

फरांडेबाबांनी आमंत्रण स्वीकारून तलवारीने स्वतःवर वार करत हेडाम नृत्य केले.

यावेळी ढोलवादन आणि कैताळवादन अखंड चालू होते. या यात्रेला जवळपास दोन लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close