S M L

हेडलीबाबत अमेरिकेने भारताला माहिती दिली नाही

27 ऑक्टोबरअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीपूर्वी हेडलीच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिकेत मतभेद झाले आहे. मुंबई हल्ल्यापूर्वी किंवा त्यानंतर लगेच अमेरिकेने भारताला हेडलीची माहिती दिली नाही, असे केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी म्हटले आहे. मार्च 2009 मध्ये हेडली भारतात आला होता. 26/11 नंतर ताबडतोब अमेरिकेने हेडलीची माहिती दिली असती तर त्याला त्यावेळी अटक करणे शक्य होते, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने मात्र पिल्लई यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. हेडलीबद्दल अमेरिकेने भारताला वेळोवेळी माहिती दिली, असा दावा अमेरिकेचे भारतातले राजदूत टिमोथी रोमेर यांनी सांगितले आहे. दरम्यान, ओबामांच्या भारतभेटीवेळी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत अतिरेकी आहेत, आणि निरपराध लोकं त्यात बळी पडू शकतात असा इशारा पिल्लई यांनी दिला आहे. आण्विक दुर्घटना भरपाई करार दरम्यान ओबामांच्या भारतभेटीपूर्वी भारताने अणुकसहकार्य करारा-संदर्भातली अमेरिकेची एक मागणी पूर्ण केली आहे. भारताने 'कन्हेंशन ऑफ सप्लिमेंटरी कम्पेंसेशन' या करारावर सह्या केल्या आहे. एखादी आण्विक दुर्घटना घडल्यास त्यासाठी भरपाई मिळण्यासंदर्भातला हा जागतिक करार आहे. यामुळे आण्विक दुर्घटनेची नेमकी जबाबदारी निश्चित होणार आहे. भारताने यापूर्वीच न्यूक्लिअर लायबिलीटी विधेयकाला मंजुरी दिली. पण त्यातल्या तरतुदींवर अमेरिका नाराज आहे. कारण एखादी दुर्घटना घडल्यास या कायद्यामुळे भारतीय ऑपरेटरला परदेशी पुरवठादारा-विरोधात अमर्यादित भरपाईचा दावा दाखल करता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 04:40 PM IST

हेडलीबाबत अमेरिकेने भारताला माहिती दिली नाही

27 ऑक्टोबर

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीपूर्वी हेडलीच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिकेत मतभेद झाले आहे.

मुंबई हल्ल्यापूर्वी किंवा त्यानंतर लगेच अमेरिकेने भारताला हेडलीची माहिती दिली नाही, असे केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी म्हटले आहे. मार्च 2009 मध्ये हेडली भारतात आला होता.

26/11 नंतर ताबडतोब अमेरिकेने हेडलीची माहिती दिली असती तर त्याला त्यावेळी अटक करणे शक्य होते, असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने मात्र पिल्लई यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. हेडलीबद्दल अमेरिकेने भारताला वेळोवेळी माहिती दिली, असा दावा अमेरिकेचे भारतातले राजदूत टिमोथी रोमेर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ओबामांच्या भारतभेटीवेळी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत अतिरेकी आहेत, आणि निरपराध लोकं त्यात बळी पडू शकतात असा इशारा पिल्लई यांनी दिला आहे.

आण्विक दुर्घटना भरपाई करार

दरम्यान ओबामांच्या भारतभेटीपूर्वी भारताने अणुकसहकार्य करारा-संदर्भातली अमेरिकेची एक मागणी पूर्ण केली आहे.

भारताने 'कन्हेंशन ऑफ सप्लिमेंटरी कम्पेंसेशन' या करारावर सह्या केल्या आहे. एखादी आण्विक दुर्घटना घडल्यास त्यासाठी भरपाई मिळण्यासंदर्भातला हा जागतिक करार आहे.

यामुळे आण्विक दुर्घटनेची नेमकी जबाबदारी निश्चित होणार आहे. भारताने यापूर्वीच न्यूक्लिअर लायबिलीटी विधेयकाला मंजुरी दिली.

पण त्यातल्या तरतुदींवर अमेरिका नाराज आहे.

कारण एखादी दुर्घटना घडल्यास या कायद्यामुळे भारतीय ऑपरेटरला परदेशी पुरवठादारा-विरोधात अमर्यादित भरपाईचा दावा दाखल करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close