S M L

दीपक कपूर अडचणीत

03 नोव्हेंबरआदर्श हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर अडचणीत आलेत. आता कपूर यांच्याशी संबंधित काही पत्रव्यवहार आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेत. त्यावरून दीपक कपूर यांच्या अनेक बेहिशेबी मालमत्ता असल्याचं स्पष्ट होत आहे. माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांच्या अडचणी वाढल्यात. पहिल्यांदा सुखना भूखंड घोटाळा. एका खासगी विकासकाला मदत केल्याचा आरोप असलेले लष्कराचे सचिव अवधेश प्रकाश यांच्याबाबत कपूर यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याची टीका झालीनंतर आदर्श हाऊसिंग सोसायटी प्रकरण या सोसायटीत दीपक कपूर यांचा फ्लॅट असल्याचे सिद्ध झाले आहे.तसेच कपूर यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र लिहून रहिवासी नियमांत सूट देण्याची मागणी केल्याचंही उघड झाले आहे.आणि आता तृणमूल काँग्रेसचे खासदार अंबिका बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेलं पत्र कपूर यांना अडचणीत आणणारं आहे. 5 ऑगस्ट रोजी लिहिलेले हे पत्र आहे. त्यात दीपक कपूर यांच्या मालमत्तेची यादी देण्यात आली. लष्करी अधिकार्‍याच्या उत्पन्नाच्या मार्गांचा विचार करता ही मालमत्ता बेहिशेबी असल्याचा पत्राचा सूर आहे. कपूर यांच्या दिल्ली आणि गुरगावमधल्या महत्त्वाच्या मालमत्तांचा तपशील यात देण्यात आली आहे. मालमत्तांचा तपशील - द्वारकात सेक्टर 29 मध्ये फ्लॅट - गुरगावमध्ये सेक्टर 23 मध्ये तीन फ्लॅट्स - गुरगावमध्येच सेक्टर 42/44 मध्ये एक फ्लॅट - गुरगावमध्ये फेज-3 मध्ये आणखी एक फ्लॅट - मुंबईत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घर

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 06:13 PM IST

03 नोव्हेंबर

आदर्श हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर अडचणीत आलेत. आता कपूर यांच्याशी संबंधित काही पत्रव्यवहार आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेत. त्यावरून दीपक कपूर यांच्या अनेक बेहिशेबी मालमत्ता असल्याचं स्पष्ट होत आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांच्या अडचणी वाढल्यात. पहिल्यांदा सुखना भूखंड घोटाळा. एका खासगी विकासकाला मदत केल्याचा आरोप असलेले लष्कराचे सचिव अवधेश प्रकाश यांच्याबाबत कपूर यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याची टीका झाली

नंतर आदर्श हाऊसिंग सोसायटी प्रकरण या सोसायटीत दीपक कपूर यांचा फ्लॅट असल्याचे सिद्ध झाले आहे.तसेच कपूर यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र लिहून रहिवासी नियमांत सूट देण्याची मागणी केल्याचंही उघड झाले आहे.

आणि आता तृणमूल काँग्रेसचे खासदार अंबिका बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेलं पत्र कपूर यांना अडचणीत आणणारं आहे. 5 ऑगस्ट रोजी लिहिलेले हे पत्र आहे. त्यात दीपक कपूर यांच्या मालमत्तेची यादी देण्यात आली.

लष्करी अधिकार्‍याच्या उत्पन्नाच्या मार्गांचा विचार करता ही मालमत्ता बेहिशेबी असल्याचा पत्राचा सूर आहे. कपूर यांच्या दिल्ली आणि गुरगावमधल्या महत्त्वाच्या मालमत्तांचा तपशील यात देण्यात आली आहे.

मालमत्तांचा तपशील

- द्वारकात सेक्टर 29 मध्ये फ्लॅट

- गुरगावमध्ये सेक्टर 23 मध्ये तीन फ्लॅट्स

- गुरगावमध्येच सेक्टर 42/44 मध्ये एक फ्लॅट

- गुरगावमध्ये फेज-3 मध्ये आणखी एक फ्लॅट

- मुंबईत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close