S M L

सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वाला पाठिंबा-ओबामा

8 नोव्हेंबरयेत्या दोन वर्षात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळवून देण्यास अमेरिका मदत करेल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद दोन्ही देशातील लोकांनीच सोडवायचे आहेत, त्यात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. या भूमिकेचा ओबामा यांनी यावेळी पुनरुच्चार केला.पण अल कायदा आणि तालीबान्यांशी युध्द सुरु असल्यामुळे पाकिस्तानला आम्ही सहकार्य करत असल्याचे ओबामांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तर महात्मा गांधींच्या अहिसेंच्या संदेशामुळेच मी अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो या शब्दात त्यांनी गांधीजींविषयीचा आपला आदर पुन्हा एकदा व्यक्त केला. भारताच्या हवामान खात्याची म्हणजेच वेधशाळेची यंत्रणा वर्षभरात अद्ययावत करण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी ओबामांनी केली. भाषणाची सुरूवात त्यांनी 'बहुत धन्यवाद' असं सांगत केली, तर शेवट त्यांनी 'जय हिंद' म्हणत केली आणि संसदेतील खासदारांसह देशवासियांचीसुध्दा मनं जिंकली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 02:15 PM IST

सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वाला पाठिंबा-ओबामा

8 नोव्हेंबर

येत्या दोन वर्षात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळवून देण्यास अमेरिका मदत करेल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली.

संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद दोन्ही देशातील लोकांनीच सोडवायचे आहेत, त्यात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. या भूमिकेचा ओबामा यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

पण अल कायदा आणि तालीबान्यांशी युध्द सुरु असल्यामुळे पाकिस्तानला आम्ही सहकार्य करत असल्याचे ओबामांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

तर महात्मा गांधींच्या अहिसेंच्या संदेशामुळेच मी अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो या शब्दात त्यांनी गांधीजींविषयीचा आपला आदर पुन्हा एकदा व्यक्त केला.

भारताच्या हवामान खात्याची म्हणजेच वेधशाळेची यंत्रणा वर्षभरात अद्ययावत करण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी ओबामांनी केली.

भाषणाची सुरूवात त्यांनी 'बहुत धन्यवाद' असं सांगत केली, तर शेवट त्यांनी 'जय हिंद' म्हणत केली आणि संसदेतील खासदारांसह देशवासियांचीसुध्दा मनं जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close