S M L

आसाममध्ये 13 स्फोट, 61 ठार , 300 जखमी

30 ऑक्टोबर, आसामब्युरो रिपोर्टआसाममध्ये आज सहा मिनिटात 13 सीरियल स्फोट घडवून आणण्यात आले. सारे स्फोट गर्दीच्या ठिकाणी झाले असून या स्फोटांत 61 जण ठार तर, 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींमध्ये एका पोलीस अधिकार्‍याचाही समावेश आहे. आसाम सरकारनं मात्र 12 स्फोट झाल्याचं मान्य केलं आहे. गुवाहाटीमध्ये 6, कोकराझारमध्ये 3, बोंगाईगावमध्ये 1 आणि बारपेटामध्ये 2 स्फोट झाल्याची माहिती आसाम सरकारनं दिली. स्फोटामुळं मोठ्या प्रमाणात या परिसरात आग लागली. अनेक गाड्या त्यामुळं खाक झाल्या. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मृतांच्या वारसांना एक लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.स्फोटांसाठी आरडीएक्स चा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच यासंदर्भातला अधिकृत खुलासा होईल. या स्फोटांनंतर आसाममध्ये रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयानं आसाम सरकारकडून अहवाल मागावला आहे.इंटेलिजन्स एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उल्फा या दहशतवादी संघटनेची ' ब्रॅव्हो ' कंपनी या स्फोटांमागे असण्याची शक्यता आहे. उल्फाच्या ' अल्फा ' आणि ' चार्ली ' या इतर दोन संघटनांनीआधीच शस्त्रसंधीच्या करारावर सह्या केल्याने एकाकी पडलेल्या ' ब्रॅव्हो ' कंपनीने हे स्फोट घडवले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.बॉम्बस्फोटानंतर लगेचच पोलिसांसह नागरिकांनीही मदतकार्य चालू केलं. केंद्रानही सुरक्षिततेसाठी निमलष्करी दल पाठवल असून, संपूर्ण आसामध्ये हाय अ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. स्फोटामुळ चिडलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करण्याचे प्रकारही घडले. स्फोटातल्या जखमींना गुवाहाटी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2008 09:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2008 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close