S M L

'आदर्श' राजीनामा

9 नोव्हेंबर, मुंबई आदर्श घोटाळा प्रकरणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर पायउतार व्हावं लागलंय. आपला राजीनामा त्यांनी सकाळी राज्यपाल शंकरनारायणन यांच्याकडे सादर केला. गेल्या आठवड्यात चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. तो हायकमांडने मंजूर केल्यानंतर चव्हाण सकाळी राज्यपालांना भेटले. चौकशीसाठी तयार- अशोक चव्हाणमी चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाहूयात चव्हाण काय म्हणाले ते -मला आज हे सांगण्यात आलं की राजीनामा मंजूर, तपास बाकी आहेकाँग्रेस पक्षाचे काही नैतिक मूल्यं आहेत. आजही मी सांगेन की राज्य सरकारने कोणतीही चूक केलेली नाहीमाझा सेटबॅकवर विश्वास नाही. हा मी सेटबॅक मानत नाहीमी निर्दोष आहे हे तपासानंतर कळेल, याचा मला विश्वास आहेमी पक्षाचं काम करत राहीनमी कोणाला दोष देत नाहीलोकांच्या मनातलं संभ्रम दूर होणं आवश्यक आहेमी तर पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे'आदर्श'ची चौकशीआदर्श घोटाळाप्रकरणी दोषी अधिका-यांवरही कारवाई करावी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी मागणी केली आहे. आदर्श प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी ए. के. अँटोनी यांनी मागणी केली आहे. सगळे निर्णय हायकमांडवर अवलंबून असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेसने चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री तसंच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी यांची दोनसदस्यीय समिती नेमून आदर्श घोटाळा प्रकरणी अहवाल मागवला आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याच्या निर्णयाला उशीर झाला आहे असं म्हटलंय. 'ज्या मंत्र्यानी आणि अधिका-यांनी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे त्याचं काय ? तसंच चव्हाणांवरच्या कारवाईने काही होणार नाही, निर्णयाला उशीर झाला, ज्यांनी सह्या केल्या त्यांचं काय, मंत्र्यांवरही कारवाई करा' असं राज ठाकरेंनी म्हटलंय.मुख्यमंत्री कोण ? संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस पदाधिका-यांची बैठक दिल्लीत होणार आहे. तर महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा समितीची आज रात्री बैठक होईल. त्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरवण्यात येईल. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतीच्या चर्चेमध्ये नावं आहेत ती माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनीक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची. यापैकी सगळ्यांत जास्त चर्चा आहे ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची. 'आदर्श' घोटाळाआदर्श घोटाळा नेमका काय आहे, त्याचा लष्कराशी कसा संबंध आहे ते पाहूया....आर्मी, नेव्ही, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक. हे कुलाब्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असणा•या आदर्श हाऊसिंग सोसायटीतले हाय प्रोफाईल फ्लॅटधारक. खरं म्हणजे हे फ्लॅट कारगिल युद्धातले शूर सैनिक आणि शहिदांच्या विधवांच्या मालकीचे असायला हवे होते. ही 31 मजली इमारत आता वादात सापडलीय. यात नेमकं काय चुकलं? नियोजित हेलिपॅड आणि लष्करी तळाला लागून ही सोसायटी आहेखरं पाहता ही इमारत चुकीच्या ठिकाणी आहेही इमारत 104 मीटर उंच आहेया इमारतीनं कोस्टल रेग्युलेशन झोनची 30 मीटरची मर्यादा ओलांडली आहेमूळ आराखडा 6 मजल्यांचा होता पण प्रत्यक्षात ही इमारत 31 मजल्यांची आहे2004 मध्ये कुलाब्यातल्या मोक्याच्या जागेचा ताबा सोसायटीला मिळाला. एका वर्षांच्या आतच बांधकामासाठी सर्व क्लिअरन्स मिळाले. युद्धातल्या सैनिकांसाठी असलेल्या या फ्लॅटवर बड्या लष्करी अधिका-यांनी डल्ला मारला. MMRDA नं इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिली. आणि हाय राईज कमिटीनं इमारत 104 मीटरची उंची गाठेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मूळ प्रश्न आहे जागा कोणाची. आता लष्करानंही यातून हात झटकण्याचे प्रयत्न चालवलेत. आयबीएन-लोकमतला मिळालेल्या महसूल विभागाच्या पत्रव्यवहारात स्पष्ट दिसतंय की ही जमीन सोसायटीला देण्यात आलीय. आणि त्यासाठी प्रमोटर्सनी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची सूचना आहे.त्यानंतर एका वर्षांनं म्हणजेच 2004 मध्ये महसूल विभागाच्या अधिका-यांनी अचानक यू टर्न घेतला. आणि ही जमीन लष्कराची नसल्याचं सांगितलं. पण हा दावा सपशेल खोटा ठरला. कारण त्यानंतर 4 महिन्यांनी संरक्षणविषयक मालमत्तेच्या महासंचालकांनी लाल झेंडा दाखवला. वीणा मैत्र यांच्या पत्रात म्हटलंय- ' ही जमीन लष्कराच्या ताब्यात आहे, सैन्यदलाच्या आवारात ही जमीन येते. त्याला कुंपणाची भिंत आणि गेट आहे. मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिसनं ती बांधलीय.'नेव्हीनंसुद्धा ऑगस्ट 2009 मध्ये आपली चिंता व्यक्त केली. या सोसायटीला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द व्हायला पाहिजे असं नेव्हीनं म्हटलं. सुखना भूखंड घोटाळ्यानंतर सैन्यदलाला मिळालेला हा दुसरा मोठा धक्का आहे. बडे लष्करी अधिकारी यात गुंतल्यानं प्रकरण गंभीर तसंच लाजीरवाणं बनलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2010 07:49 AM IST

'आदर्श' राजीनामा

9 नोव्हेंबर, मुंबई

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर पायउतार व्हावं लागलंय. आपला राजीनामा त्यांनी सकाळी राज्यपाल शंकरनारायणन यांच्याकडे सादर केला. गेल्या आठवड्यात चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. तो हायकमांडने मंजूर केल्यानंतर चव्हाण सकाळी राज्यपालांना भेटले.

चौकशीसाठी तयार- अशोक चव्हाण

मी चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाहूयात चव्हाण काय म्हणाले ते -

मला आज हे सांगण्यात आलं की राजीनामा मंजूर, तपास बाकी आहे

काँग्रेस पक्षाचे काही नैतिक मूल्यं आहेत. आजही मी सांगेन की राज्य सरकारने कोणतीही चूक केलेली नाही

माझा सेटबॅकवर विश्वास नाही. हा मी सेटबॅक मानत नाही

मी निर्दोष आहे हे तपासानंतर कळेल, याचा मला विश्वास आहे

मी पक्षाचं काम करत राहीन

मी कोणाला दोष देत नाही

लोकांच्या मनातलं संभ्रम दूर होणं आवश्यक आहे

मी तर पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे

'आदर्श'ची चौकशी

आदर्श घोटाळाप्रकरणी दोषी अधिका-यांवरही कारवाई करावी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी मागणी केली आहे. आदर्श प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी ए. के. अँटोनी यांनी मागणी केली आहे. सगळे निर्णय हायकमांडवर अवलंबून असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

काँग्रेसने चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री तसंच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी यांची दोनसदस्यीय समिती नेमून आदर्श घोटाळा प्रकरणी अहवाल मागवला आहे.

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याच्या निर्णयाला उशीर झाला आहे असं म्हटलंय. 'ज्या मंत्र्यानी आणि अधिका-यांनी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे त्याचं काय ? तसंच चव्हाणांवरच्या कारवाईने काही होणार नाही, निर्णयाला उशीर झाला, ज्यांनी सह्या केल्या त्यांचं काय, मंत्र्यांवरही कारवाई करा' असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

मुख्यमंत्री कोण ?

संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस पदाधिका-यांची बैठक दिल्लीत होणार आहे. तर महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा समितीची आज रात्री बैठक होईल. त्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरवण्यात येईल.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतीच्या चर्चेमध्ये नावं आहेत ती माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनीक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची. यापैकी सगळ्यांत जास्त चर्चा आहे ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची.

'आदर्श' घोटाळा

आदर्श घोटाळा नेमका काय आहे, त्याचा लष्कराशी कसा संबंध आहे ते पाहूया....

आर्मी, नेव्ही, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक. हे कुलाब्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असणा•या आदर्श हाऊसिंग सोसायटीतले हाय प्रोफाईल फ्लॅटधारक. खरं म्हणजे हे फ्लॅट कारगिल युद्धातले शूर सैनिक आणि शहिदांच्या विधवांच्या मालकीचे असायला हवे होते. ही 31 मजली इमारत आता वादात सापडलीय. यात नेमकं काय चुकलं?

नियोजित हेलिपॅड आणि लष्करी तळाला लागून ही सोसायटी आहेखरं पाहता ही इमारत चुकीच्या ठिकाणी आहेही इमारत 104 मीटर उंच आहेया इमारतीनं कोस्टल रेग्युलेशन झोनची 30 मीटरची मर्यादा ओलांडली आहेमूळ आराखडा 6 मजल्यांचा होता पण प्रत्यक्षात ही इमारत 31 मजल्यांची आहे

2004 मध्ये कुलाब्यातल्या मोक्याच्या जागेचा ताबा सोसायटीला मिळाला. एका वर्षांच्या आतच बांधकामासाठी सर्व क्लिअरन्स मिळाले. युद्धातल्या सैनिकांसाठी असलेल्या या फ्लॅटवर बड्या लष्करी अधिका-यांनी डल्ला मारला. MMRDA नं इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिली. आणि हाय राईज कमिटीनं इमारत 104 मीटरची उंची गाठेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मूळ प्रश्न आहे जागा कोणाची. आता लष्करानंही यातून हात झटकण्याचे प्रयत्न चालवलेत.

आयबीएन-लोकमतला मिळालेल्या महसूल विभागाच्या पत्रव्यवहारात स्पष्ट दिसतंय की ही जमीन सोसायटीला देण्यात आलीय. आणि त्यासाठी प्रमोटर्सनी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची सूचना आहे.

त्यानंतर एका वर्षांनं म्हणजेच 2004 मध्ये महसूल विभागाच्या अधिका-यांनी अचानक यू टर्न घेतला. आणि ही जमीन लष्कराची नसल्याचं सांगितलं. पण हा दावा सपशेल खोटा ठरला. कारण त्यानंतर 4 महिन्यांनी संरक्षणविषयक मालमत्तेच्या महासंचालकांनी लाल झेंडा दाखवला. वीणा मैत्र यांच्या पत्रात म्हटलंय- ' ही जमीन लष्कराच्या ताब्यात आहे, सैन्यदलाच्या आवारात ही जमीन येते. त्याला कुंपणाची भिंत आणि गेट आहे. मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिसनं ती बांधलीय.'

नेव्हीनंसुद्धा ऑगस्ट 2009 मध्ये आपली चिंता व्यक्त केली. या सोसायटीला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द व्हायला पाहिजे असं नेव्हीनं म्हटलं. सुखना भूखंड घोटाळ्यानंतर सैन्यदलाला मिळालेला हा दुसरा मोठा धक्का आहे. बडे लष्करी अधिकारी यात गुंतल्यानं प्रकरण गंभीर तसंच लाजीरवाणं बनलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2010 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close