S M L

नागपूरात कॅशीयरवर गोळीबार करून 15 लाख लूटले

15 नोव्हेंबरनागपूरच्या गिट्टीखदानमधल्या अवस्थीनगर इथ ब्रायलर कंपनीच्या कॅशीयरवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार करून 15 लाखाची रक्कम लूटली. काल रात्री ही घटना घडली. कॅ शीयर काम आटोपून व्यवस्थापकाकडे पैसे जमा करायला जात असतांना काही अज्ञात लोकांनी कॅशीयरचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर देशी कट्यांने गोळीबार केला.विशेष म्हणजे घटनास्थळाजवळच पोलिस आणि सीबीआयचे मुख्यालय आहे. या गोळीबारात कॅशीयर नईम गंभीर जखमी झाला.नईम च्या कानाला आणि छातीला गोळी लागली आहे. गेल्या काही दिवसांमधली ही दुसरी मोठी घटना असल्याने नागपूमध्ये खळबळ उडाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 07:35 AM IST

नागपूरात कॅशीयरवर गोळीबार करून 15 लाख लूटले

15 नोव्हेंबर

नागपूरच्या गिट्टीखदानमधल्या अवस्थीनगर इथ ब्रायलर कंपनीच्या कॅशीयरवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार करून 15 लाखाची रक्कम लूटली. काल रात्री ही घटना घडली.

कॅ शीयर काम आटोपून व्यवस्थापकाकडे पैसे जमा करायला जात असतांना काही अज्ञात लोकांनी कॅशीयरचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर देशी कट्यांने गोळीबार केला.

विशेष म्हणजे घटनास्थळाजवळच पोलिस आणि सीबीआयचे मुख्यालय आहे. या गोळीबारात कॅशीयर नईम गंभीर जखमी झाला.

नईम च्या कानाला आणि छातीला गोळी लागली आहे. गेल्या काही दिवसांमधली ही दुसरी मोठी घटना असल्याने नागपूमध्ये खळबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 07:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close