S M L

राणेंवर शिवसेनेचा जमीन गैरव्यवहाराचा आरोप

15 नोव्हेंबरमहसूलमंत्री नारायण राणे यांच्यावर आणखी एक जमीन गैरव्यवहाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. राणे यांच्या सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्युनिटी सेंटरसाठी भाड्याने घेण्यात आलेली अंधेरी आंबोली इथली 1540 चौरस मीटर जागा द जेल या अलिशान हॉटेलसाठी राणे यांनी दिल्याचा आरोप शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. आज उपरकर यांनी याविरोधात सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. याविषयीचे निवेदन उपरकर यांनी कागदपत्रांसह जिल्हाधिका-यांना आज दिले.1999 साली मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना नारायण राणे यांनी ही जमीन सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्युनिटी सेंटरसाठी अवघ्या 200 रूपये प्रति चौरस मीटर दराने 30 वर्षांच्या करारावर भाड्यानं घेतली होती. केवळ एका महिन्यात या कराराचे सर्व कागदपत्रीय सोपस्कार पार पाडण्यात आले होते. ही जागा केवळ कम्युनिटी सेंटरसाठीच वापरण्यात यावी अशी अट जिल्हाधिका-यांनी घातली होती. मात्र या जागेचा दिलेल्या उद्देशासाठी वापर न होता आता त्या जागेवर द जेल नावाचं अलिशान हॉटेल उभ आहे. सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणीवर राणेंच्या पत्नी निलम राणे अध्यक्ष म्हणून आहेत तर राणेंचे अन्य नातेवाईक आणि जवळचे कार्यकर्ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 05:09 PM IST

राणेंवर शिवसेनेचा जमीन गैरव्यवहाराचा आरोप

15 नोव्हेंबर

महसूलमंत्री नारायण राणे यांच्यावर आणखी एक जमीन गैरव्यवहाराचा आरोप शिवसेनेने केला आहे.

राणे यांच्या सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्युनिटी सेंटरसाठी भाड्याने घेण्यात आलेली अंधेरी आंबोली इथली 1540 चौरस मीटर जागा द जेल या अलिशान हॉटेलसाठी राणे यांनी दिल्याचा आरोप शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

आज उपरकर यांनी याविरोधात सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

याविषयीचे निवेदन उपरकर यांनी कागदपत्रांसह जिल्हाधिका-यांना आज दिले.1999 साली मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना नारायण राणे यांनी ही जमीन सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्युनिटी सेंटरसाठी अवघ्या 200 रूपये प्रति चौरस मीटर दराने 30 वर्षांच्या करारावर भाड्यानं घेतली होती.

केवळ एका महिन्यात या कराराचे सर्व कागदपत्रीय सोपस्कार पार पाडण्यात आले होते. ही जागा केवळ कम्युनिटी सेंटरसाठीच वापरण्यात यावी अशी अट जिल्हाधिका-यांनी घातली होती.

मात्र या जागेचा दिलेल्या उद्देशासाठी वापर न होता आता त्या जागेवर द जेल नावाचं अलिशान हॉटेल उभ आहे.

सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणीवर राणेंच्या पत्नी निलम राणे अध्यक्ष म्हणून आहेत तर राणेंचे अन्य नातेवाईक आणि जवळचे कार्यकर्ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close