S M L

नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज

30 ऑक्टोबर,लातूरआशिष जाधवनियमित कर्जफेड करणार्‍या राज्यातील 26 लाख शेतकर्‍यांना राज्य सरकार दिवाळी भेट देणार आहेत. थकबाकीदार नसलेल्या या शेतकर्‍यांसाठी 5 हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना राबवली. या योजनेचा साधरणत: साडेआठ हजार कोटी रुपयांचा हिस्सा महाराष्ट्राच्या वाट्याला आला. 5 एकरापेक्षा कमी जमीनअसलेल्या 27 लाख शेतकर्‍यांची तर 5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या साडेदहा लाख शेतकर्‍यांची थकबाकी माफ करण्यात आली. पण नियमित कर्जफेड करणार्‍या 26 लाख शेतकर्‍यांना या योजनेचा कुठलाही फायदा मिळाला नाही. त्यामुळेच थकबाकीदार नसलेल्या या शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळावं, यासाठी पाच हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.या पॅकेजमुळं राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. पण त्यातून केंद्राच्या मदतीनं मार्ग काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेमुळे नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यां प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2008 12:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2008 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close