S M L

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा संबंध पंतप्रधान कार्यालयाशी असण्याची शक्यता

मीतू जैन दिल्ली18 नोव्हेंबरटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांनी राजीनामा दिला असला तरी सरकारसमोरच्या समस्या मात्र कमी झालेल्या नाहीयेत. आता या घोटाळ्याचा संबंध थेट पंतप्रधान कार्यालयाशी असल्याचे आरोप होत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. याप्रकरणी आयबीएन नेटवर्ककडे महत्त्वाची कागदपत्रं आली. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान बॅकफूटवर आहेत. आधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कृतिशून्यतेवर नाराजी व्यक्त केली. नंतर विरोधकांनी संसदेत त्यांच्या स्पष्टकरणाची मागणी केली. पंतप्रधानांच्या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केले. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की ए राजांवर कारवाई करण्याची परवानगी देण्यात पंतप्रधानांनी दिरंगाई का केली. आता कोर्टाने आदेश दिले आहेत. की येत्या शनिवारपर्यंत सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावं. पण राजांविरोधात याचिका दाखल करणारे सुब्रमण्यम स्वामी सरकारच्या उत्तराने अजिबात समाधानी नाही.संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमकी घडत आहे. सरकारची स्थिती अडचणीची आहे. याची कल्पना आल्याने विरोधक आक्रमक झालेत. पण कर्नाटक भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे तेही आता अडचणीत आले आहे. राजांच्या राजीनाम्यानंतर टूजी स्पेक्ट्रमचा मुद्दा शांत होईल, अशी यूपीए सरकारची अपेक्षा होती. पण आता या घोटाळ्याची धग थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहचली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 04:49 PM IST

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा संबंध पंतप्रधान कार्यालयाशी असण्याची शक्यता

मीतू जैन दिल्ली

18 नोव्हेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांनी राजीनामा दिला असला तरी सरकारसमोरच्या समस्या मात्र कमी झालेल्या नाहीयेत. आता या घोटाळ्याचा संबंध थेट पंतप्रधान कार्यालयाशी असल्याचे आरोप होत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. याप्रकरणी आयबीएन नेटवर्ककडे महत्त्वाची कागदपत्रं आली.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान बॅकफूटवर आहेत. आधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कृतिशून्यतेवर नाराजी व्यक्त केली. नंतर विरोधकांनी संसदेत त्यांच्या स्पष्टकरणाची मागणी केली. पंतप्रधानांच्या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केले.

मंगळवारी सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की ए राजांवर कारवाई करण्याची परवानगी देण्यात पंतप्रधानांनी दिरंगाई का केली. आता कोर्टाने आदेश दिले आहेत. की येत्या शनिवारपर्यंत सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावं. पण राजांविरोधात याचिका दाखल करणारे सुब्रमण्यम स्वामी सरकारच्या उत्तराने अजिबात समाधानी नाही.

संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमकी घडत आहे. सरकारची स्थिती अडचणीची आहे. याची कल्पना आल्याने विरोधक आक्रमक झालेत. पण कर्नाटक भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे तेही आता अडचणीत आले आहे. राजांच्या राजीनाम्यानंतर टूजी स्पेक्ट्रमचा मुद्दा शांत होईल, अशी यूपीए सरकारची अपेक्षा होती. पण आता या घोटाळ्याची धग थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहचली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close