S M L

जमीन घोटाळ्या प्रकरणी आपण निर्दोष -येडियुरप्पा

18 नोव्हेंबरयेडियुरप्पा यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याचे आज कर्नाटक जोरदार पडसाद उमटताहेत. दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेसच्या काही खासदारांनी याप्रकरणी जोरदार निदर्शनं केली. तर येडियुरप्पा मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा करताहेत. येडियुरप्पांनी केलेल्या घोटाळा प्रकरणाचे पडसाद दिल्लीत उमटताना दिसले. कर्नाटक भाजपतलाच एक गट त्यांच्या विरोधात जोरदार काम करत असल्याची तक्रार येडियुरप्पांनी नितीन गडकरींकडे केली. तसेच, नेतृत्त्व बदलासंदर्भात संघाकडून दबाव आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. याप्रकरणामुळे दबावाखाली आलेल्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेऊन याप्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन येडियुरप्पांनी पद सोडायला हवं, अशी मागणी काँग्रेसने केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 04:57 PM IST

जमीन घोटाळ्या प्रकरणी आपण निर्दोष -येडियुरप्पा

18 नोव्हेंबर

येडियुरप्पा यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याचे आज कर्नाटक जोरदार पडसाद उमटताहेत. दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेसच्या काही खासदारांनी याप्रकरणी जोरदार निदर्शनं केली. तर येडियुरप्पा मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा करताहेत.

येडियुरप्पांनी केलेल्या घोटाळा प्रकरणाचे पडसाद दिल्लीत उमटताना दिसले. कर्नाटक भाजपतलाच एक गट त्यांच्या विरोधात जोरदार काम करत असल्याची तक्रार येडियुरप्पांनी नितीन गडकरींकडे केली.

तसेच, नेतृत्त्व बदलासंदर्भात संघाकडून दबाव आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. याप्रकरणामुळे दबावाखाली आलेल्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेऊन याप्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन येडियुरप्पांनी पद सोडायला हवं, अशी मागणी काँग्रेसने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close