S M L

डॉ.आंबेडकर यांच्या दिल्लीतील बंगल्याला राजघाटाचा दर्जा द्यावा

19 नोव्हेंबरभारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्ली येथील बंगल्याला राजघाटाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत या मागणीसाठी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा डॉक्टर आंबेडकर परिनिर्वाण भूमी सन्मान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिल्लीतल्या 26 अलीपूर रोड येथे राहत होते. हे घर सध्या पडिक अवस्थेत आहे. घराची दुरावस्था झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी तसंच त्यांच्या स्मृतीशी संबंधित वस्तूंबाबत त्यांच्या अनुयायांच्या मनात महत्त्वाचं स्थान आहे. महू येथील जन्मभूमी, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दिक्षा भूमी आणि दिल्लीत ज्या घरात त्यांचं निधन झालं ते 26 अलीपूर रोड ज्याला परिनिर्वाण भूमी असंही म्हणतात. हे चार धामही आंबेडकरांच्या अनुयायांसाठी श्रद्धास्थानी आहेत.याच घरात बाबसाहेबांनी घटना लिहली. याच घरात बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक लिहलं.आणि याचं घरात बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं. हे घरं भावी पिढीसाठी प्रेरणा देईल. असं एखाद स्मारक या ठिकाणी व्हायला हवं, अशी हा समितीची मागणी आहे. समितीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या घरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी समितीचे पदाधिकारी टि.एम.कांबळे, युवराज मोहिते हे पदाधिकारी राज्यभर दौरे काढून जनजागृती करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 02:54 PM IST

डॉ.आंबेडकर यांच्या दिल्लीतील बंगल्याला राजघाटाचा दर्जा द्यावा

19 नोव्हेंबर

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्ली येथील बंगल्याला राजघाटाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत या मागणीसाठी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा डॉक्टर आंबेडकर परिनिर्वाण भूमी सन्मान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिल्लीतल्या 26 अलीपूर रोड येथे राहत होते. हे घर सध्या पडिक अवस्थेत आहे. घराची दुरावस्था झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी तसंच त्यांच्या स्मृतीशी संबंधित वस्तूंबाबत त्यांच्या अनुयायांच्या मनात महत्त्वाचं स्थान आहे. महू येथील जन्मभूमी, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दिक्षा भूमी आणि दिल्लीत ज्या घरात त्यांचं निधन झालं ते 26 अलीपूर रोड ज्याला परिनिर्वाण भूमी असंही म्हणतात. हे चार धामही आंबेडकरांच्या अनुयायांसाठी श्रद्धास्थानी आहेत.

याच घरात बाबसाहेबांनी घटना लिहली. याच घरात बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक लिहलं.आणि याचं घरात बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं. हे घरं भावी पिढीसाठी प्रेरणा देईल. असं एखाद स्मारक या ठिकाणी व्हायला हवं, अशी हा समितीची मागणी आहे. समितीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या घरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी समितीचे पदाधिकारी टि.एम.कांबळे, युवराज मोहिते हे पदाधिकारी राज्यभर दौरे काढून जनजागृती करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close