S M L

पंतप्रधानांचं प्रतिज्ञापत्र दाखल

20 नोव्हेंबरटू-जी 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी ए राजा यांना राजीनामा द्यावा लागला. यानतंर विरोधानी पंतप्रधानावर आरोप प्रत्यारोप झाले. अखेर आज पंतप्रधानाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात प्रतित्रापत्र दाखल करण्यात आलं आहे. 10 पानांच्या या प्रतिज्ञापत्रात तक्रारकर्ते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांच्या प्रत्येक अर्जांना आणि तक्रारींना पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या उत्तराचा आणि पत्रव्यवहाराचा तपशील आहे. स्वामी यांच्या प्रत्येक प्रश्नांना आणि तक्रारींना उत्तर दिल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.प्रतिज्ञापत्रातील मुद्दे मे 2009 मध्ये स्वामी यांच्या तक्रारी, संबंधित विधी आणि न्याय मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या. 7 ऑक्टोबरला 2009 ला स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्रं पाठवलं होतं. या पत्रात स्पेक्ट्रम घोटाळ्याबद्दल त्यांच्या तक्रारीवर पंतप्रधान कार्यालयामार्फत सुरु असलेल्या चौकशीबद्दल मला कल्पना आहे असं लिहीलं होत. ए राजा यांच्याविरुध्द एका पत्राला राष्ट्रपती कार्यालयानं पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल होत. कार्यालयानं हे पत्र विधी आणि न्याय मंत्रालयाकडे पाठवलं होतं. त्यावर या मंत्रालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरु असल्यामुळे ए राजा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचा मंजूरी देता येणार नाही अशी शिफारस केली होती. या शिफारसीमुळेच डॉटने 19 मार्च 2010 मध्ये सुब्रमन्यम स्वामी यांना पत्र लिहून राजा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मंजूरी देण संयुक्तीक ठरणार नाही अस सांगीतल होत. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करु - पंतप्रधानटू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज अखेर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मौन सोडलं. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं.हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समिटमध्ये पंतप्रधान बोलत होते.यावेळी त्यांनी विरोधकांना संसदेच कामकाज सुरळीत चालू द्या असं आवाहनही केलं. तसेच यावेळीआर्थिक विकास दर उंचावण्यासोबतच सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आमचे प्रयत्न असतील असं मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान एचटी लीडरशीप समिटमध्ये बोलत होते. भ्रष्टाचाराच्या संकटाला प्रभावीपणे सामोरं जाण्याचं आव्हान आहे. गेल्या वर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होता. मात्र यावर्षी हा दर वाढेल अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.संंकटांचं संधीत रूपांतर करणार्‍या देशवासियांना त्यांनी सलाम केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 08:11 AM IST

पंतप्रधानांचं प्रतिज्ञापत्र दाखल

20 नोव्हेंबर

टू-जी 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी ए राजा यांना राजीनामा द्यावा लागला. यानतंर विरोधानी पंतप्रधानावर आरोप प्रत्यारोप झाले. अखेर आज पंतप्रधानाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात प्रतित्रापत्र दाखल करण्यात आलं आहे. 10 पानांच्या या प्रतिज्ञापत्रात तक्रारकर्ते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांच्या प्रत्येक अर्जांना आणि तक्रारींना पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या उत्तराचा आणि पत्रव्यवहाराचा तपशील आहे. स्वामी यांच्या प्रत्येक प्रश्नांना आणि तक्रारींना उत्तर दिल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

प्रतिज्ञापत्रातील मुद्दे मे 2009 मध्ये स्वामी यांच्या तक्रारी, संबंधित विधी आणि न्याय मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या. 7 ऑक्टोबरला 2009 ला स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्रं पाठवलं होतं. या पत्रात स्पेक्ट्रम घोटाळ्याबद्दल त्यांच्या तक्रारीवर पंतप्रधान कार्यालयामार्फत सुरु असलेल्या चौकशीबद्दल मला कल्पना आहे असं लिहीलं होत.

ए राजा यांच्याविरुध्द एका पत्राला राष्ट्रपती कार्यालयानं पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल होत. कार्यालयानं हे पत्र विधी आणि न्याय मंत्रालयाकडे पाठवलं होतं. त्यावर या मंत्रालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरु असल्यामुळे ए राजा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचा मंजूरी देता येणार नाही अशी शिफारस केली होती. या शिफारसीमुळेच डॉटने 19 मार्च 2010 मध्ये सुब्रमन्यम स्वामी यांना पत्र लिहून राजा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मंजूरी देण संयुक्तीक ठरणार नाही अस सांगीतल होत.

2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करु - पंतप्रधान

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज अखेर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मौन सोडलं. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं.

हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समिटमध्ये पंतप्रधान बोलत होते.यावेळी त्यांनी विरोधकांना संसदेच कामकाज सुरळीत चालू द्या असं आवाहनही केलं. तसेच यावेळीआर्थिक विकास दर उंचावण्यासोबतच सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आमचे प्रयत्न असतील असं मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान एचटी लीडरशीप समिटमध्ये बोलत होते. भ्रष्टाचाराच्या संकटाला प्रभावीपणे सामोरं जाण्याचं आव्हान आहे. गेल्या वर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होता. मात्र यावर्षी हा दर वाढेल अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.संंकटांचं संधीत रूपांतर करणार्‍या देशवासियांना त्यांनी सलाम केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 08:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close