S M L

ऐतिहासिक नगरीत धावणार 100 बीएमडब्ल्यू कार

21 नोव्हेंबरकाही दिवसांतच राज्यातले श्रीमंत शहर अशी औरंगाबादची ओळख होणार आहे. काही दिवसांपूर्वी दीडशे मर्सिडीज कार एकाच दिवशी खरेदी करुन जगभरातल्या उद्योगक्षेत्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आणि आता तर कार कंपन्यांना औरंगाबादवर खास लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण याच आठवड्‌यात औरंगाबादच्या रस्त्यांवर अवतरणार आहेत जवळपास शंभर बीएमडब्ल्यू कार्स... एकूण एकशे एक बीएमडब्ल्यूचे ग्रुप बुकिंग होणार आहे, त्यातील 65 गाड्या औरंगाबादमध्ये येतील. यासाठी येत्या शुक्रवारी औरंगाबादमध्ये खास कार शो चंही आयोजन करण्यात आलेले आहे. 28 लाख ते एक कोटी रुपये अशी या कार्सची किंमत आहे. या एकशे एक बीएमडब्ल्यू कार्सची किंमत आहे साधारण 85 कोटी रुपये... या गाड्या खरेदी करणा-यांमध्ये उद्योजक आणि बिल्डर्स तर आहेतच पण त्याचबरोबर डॉक्टर, वकीलसुध्दा आहेत. शहरातले खड्डे जरी वाढत असले तरी आलिशान गाड्या खरेदी करण्याची हौस काही कमी झालेली नाही. ग्रुप बुकिंग केल्याचा फायदा म्हणजे, या व्यावसायिकांना थोडे डिस्काऊंटही मिळते आणि एकत्रित खरेदी केल्यामुळे कंपनीची सर्व्हिसही चांगली मिळते.प्रवासी हेलिकॉप्टर सेवा 1 डिसेंबरपासूनएकूणच औरंगाबादचा दबदबा वाढतोय, कारण आता इथे हेलिक ॉप्टर प्रवासी सेवासुद्धा सुरु करण्यात आली आहे. प्रति तास 60 हजार रूपये दर असलेली ही सेवा 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही प्रवासी सेवा राज्यासह देशभरातील कोणत्याही शहरासाठी असणार आहे. यापूर्वी अजिंठा वेरूळ लेणीसाठी हेलिकॉप्टर सेवा करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर आता ही सेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत प्रोझोन मॉल उभारल्यानंतर तब्बल दीडशे मर्सिडिज आणि त्यानंतर आता 101 बीएमडब्ल्यू गाड्याआल्यात आणि आता ही प्रवासी हेलिक ॉप्टर सेवासुद्धा औरंगाबादकरांसाठी सुरु झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2010 03:39 PM IST

ऐतिहासिक नगरीत धावणार 100 बीएमडब्ल्यू कार

21 नोव्हेंबर

काही दिवसांतच राज्यातले श्रीमंत शहर अशी औरंगाबादची ओळख होणार आहे. काही दिवसांपूर्वी दीडशे मर्सिडीज कार एकाच दिवशी खरेदी करुन जगभरातल्या उद्योगक्षेत्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आणि आता तर कार कंपन्यांना औरंगाबादवर खास लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण याच आठवड्‌यात औरंगाबादच्या रस्त्यांवर अवतरणार आहेत जवळपास शंभर बीएमडब्ल्यू कार्स... एकूण एकशे एक बीएमडब्ल्यूचे ग्रुप बुकिंग होणार आहे, त्यातील 65 गाड्या औरंगाबादमध्ये येतील. यासाठी येत्या शुक्रवारी औरंगाबादमध्ये खास कार शो चंही आयोजन करण्यात आलेले आहे. 28 लाख ते एक कोटी रुपये अशी या कार्सची किंमत आहे.

या एकशे एक बीएमडब्ल्यू कार्सची किंमत आहे साधारण 85 कोटी रुपये... या गाड्या खरेदी करणा-यांमध्ये उद्योजक आणि बिल्डर्स तर आहेतच पण त्याचबरोबर डॉक्टर, वकीलसुध्दा आहेत. शहरातले खड्डे जरी वाढत असले तरी आलिशान गाड्या खरेदी करण्याची हौस काही कमी झालेली नाही. ग्रुप बुकिंग केल्याचा फायदा म्हणजे, या व्यावसायिकांना थोडे डिस्काऊंटही मिळते आणि एकत्रित खरेदी केल्यामुळे कंपनीची सर्व्हिसही चांगली मिळते.

प्रवासी हेलिकॉप्टर सेवा 1 डिसेंबरपासून

एकूणच औरंगाबादचा दबदबा वाढतोय, कारण आता इथे हेलिक ॉप्टर प्रवासी सेवासुद्धा सुरु करण्यात आली आहे. प्रति तास 60 हजार रूपये दर असलेली ही सेवा 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही प्रवासी सेवा राज्यासह देशभरातील कोणत्याही शहरासाठी असणार आहे. यापूर्वी अजिंठा वेरूळ लेणीसाठी हेलिकॉप्टर सेवा करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर आता ही सेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत प्रोझोन मॉल उभारल्यानंतर तब्बल दीडशे मर्सिडिज आणि त्यानंतर आता 101 बीएमडब्ल्यू गाड्याआल्यात आणि आता ही प्रवासी हेलिक ॉप्टर सेवासुद्धा औरंगाबादकरांसाठी सुरु झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2010 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close