S M L

निकालानं आम्हाला नवी दिशा दिली - सोनिया गांधी

24 नोव्हेंबरबिहारमधल्या दारुण पराभवावर काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. या निकालानं आम्हाला नवी दिशी दिली आहे. तसेच आम्हाला बिहारमध्ये फार आशा नव्हती आम्ही युतीपासून दूर राहिलो काँग्रेसने बिहारमध्ये शुन्यापासून सुरुवात केली होती. सोनियांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना शुभेच्छाही दिला. आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकता सर्व देशाला माहिती आहे तरी सुध्दा त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही अंत्यत लाजीरवाणी बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं नटवर सिंग, शशी थरुर आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला. मात्र भाजपनं आजपर्यंत येडीयुरप्पांचा राजीनामा घेतला का असा सवालही त्यांनी केला.ही तर नवी सुरुवात - मुकुल वासनिकही काँग्रेसची हार नव्हे, ही तर नवी सुरुवात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस मुकुल वासनिकांनी दिली आहे. बिहारमधल्या काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी वासनिक यांच्यावर होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 10:35 AM IST

निकालानं आम्हाला नवी दिशा दिली - सोनिया गांधी

24 नोव्हेंबर

बिहारमधल्या दारुण पराभवावर काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. या निकालानं आम्हाला नवी दिशी दिली आहे. तसेच आम्हाला बिहारमध्ये फार आशा नव्हती आम्ही युतीपासून दूर राहिलो काँग्रेसने बिहारमध्ये शुन्यापासून सुरुवात केली होती. सोनियांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना शुभेच्छाही दिला. आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकता सर्व देशाला माहिती आहे तरी सुध्दा त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही अंत्यत लाजीरवाणी बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं नटवर सिंग, शशी थरुर आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला. मात्र भाजपनं आजपर्यंत येडीयुरप्पांचा राजीनामा घेतला का असा सवालही त्यांनी केला.

ही तर नवी सुरुवात - मुकुल वासनिक

ही काँग्रेसची हार नव्हे, ही तर नवी सुरुवात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस मुकुल वासनिकांनी दिली आहे. बिहारमधल्या काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी वासनिक यांच्यावर होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close