S M L

भारतीय स्कॉश टीमला ब्राँझ मेडल

24 नोव्हेंबर आशियाई क्रीडा स्पर्धेतभारताच्या खात्यात एका ब्राँझ मेडलची भर पडली. महिलांच्या स्कॉश टीमने टीम प्रकारात ब्राँझ मेडल जिंकलं. सेमी फायनलमध्ये मलेशियाने भारतीय टीमचा 2-0 ने पराभव केला. त्यामुळे भारताला ब्राँझवर समाधान मानावं लागलं. अनाका आणि ज्योत्स्ना चिलप्पन या दोघींनी आपल्या सिंगल्सच्या मॅच सरळ गेममध्ये गमावल्या. पुरुषांच्या टीमलाही ब्राँझवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 2-0 ने पराभव केला. सिद्धार्थ सुचडे आणि सौरव घोशाल यांना आपली मॅच जिंकता आली नाही. तिरंदाजीत तरुणदीपला सिल्व्हर मेडलतिरंदाजीत भारताच्या तरुणदीप रायने सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. फायनलमध्ये कोरियाच्या वूजीन किमने त्याचा 7-3 ने पराभव केला. फायनल मॅचमध्ये तरुणदीपने चांगली सुरुवात केली होती. आणि पहिल्या तीन सेटमध्ये दोघंही बरोबरीत होते. पण त्यानंतर तरुणदीपकडून काही चुका झाल्या. याउलट प्रतिस्पर्धी वूजीन किम 10 पैकी दहा पॉइंट्स मिळवत होता. त्यामुळे तरुणदीपचं दडपण वाढलं. आणि शेवटचे दोन सेट त्याने गमावले. पण त्यापूर्वी सेमी फायनलपर्यंत मात्र त्याची कामगिरी अप्रतिम झाली. आणि त्याच्यापेक्षा सीनिअर तिरंदाजांचं आव्हान मोडून काढत त्याने मेडल पक्कं केलं. भारताचा युवा तिरंदाज राहुल बॅनर्जीचं आव्हान मात्र सेमी फायनलपूर्वीच संपुष्टात आलं. बॉक्सर्सची संमिश्र कामगिरीभारतीय बॉक्सर्ससाठी आजचा दिवस संमिश्र होता. 81 किलो वजनी गटात दिनेश कुमारनं फायनल गाठली. सेमी फायनल मॅचमध्ये नेपाळच्या दीपक महाराजनचा त्यानं 7-1 ने पराभव केला. मॅच कमालीची एकतर्फी झाली. आणि सुरुवातीपासूनच दिनेशने आघाडी घेतली होती. दिनेशच्या सहा फुटी उंचीचाही त्याला फायदा झाला. आता फायनलमध्ये दिनेशची गाठ उझबेकिस्तानच्या रसुलोव्हशी पडेल. दिनेशपाठोपाठ पुरुषांच्या साठ किलो गटात विकास कृष्णननं फायनल गाठली आहे. त्यामुळे भारताचं निदान सिल्व्हर मेडल पक्कं झालं. सेमी फायनलमध्ये विकासनं उझबेकिस्तानच्या हर्शिद तोजिबाएवचा 7-0 ने धुव्वा उडवला. विकासने शांतपणे खेळत हा विजय मिळवला. पहिल्यापासून त्याचं मॅचवर नियंत्रण होतं. आणि हुशारीने पॉइंट्स मिळवत त्याने मॅच जिंकली. आणि फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे 64 किलो वजनी गटात भारताच्या संतोष कुमारनंही फायनलमध्ये प्रवेश केला.त्यानं थायलंडच्या मासुक वुट्टीचायचा 5-1 असा सहज पराभव केला. सुरंजय सिंगला मात्र ब्राँझ मेडलएशियन चॅम्पियन सुरंजय सिंगला मात्र ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनलमध्ये सुरंजयचा मुकाबला चीनच्या याँग चँगशी होता . चँगने सुरुवातीलाच तीन पॉइंट्सची आघाडी मिळवली. पण सुरंजयही त्याला चांगली लढत देत होता. आणि म्हणता म्हणता त्याने बरोबरी साधली. दुसरा आणि तिसरा राऊंड अटीतटीचा झाला. दोघंही आक्रमक होते. आणि बरोबरीने पॉइंट्स मिळवत होते. पण अखेर याँग चँगला एका पॉइंटची आघाडी मिळाली. आणि ही रंगतदार मॅच 6-5 ने जिंकत फायनलही गाठली. परमजीतचा सेमी फायनलमध्ये पराभव भारताच्या परमजीत समोटालाही सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. 91किलो वजनी गटात परमजीतला चीनच्या झेले झँगने 15-3 असं सहज हरवलं.परमजीतकडून भारताला मोठी अपेक्षा होती. पण वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल विजेत्या झँगने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत समोटाला संधी दिली नाही. परमजीतला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं.महिला बॉक्सिंगमध्ये कविताला ब्राँझ मेडलमहिला बॉक्सिंगमध्ये कविता गोयतलाही ब्राँझ मेडल मिळालं. 75 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये चीनच्या झिंजी ली ने तिचा 5-1 ने पराभव केला. पहिल्या राऊंडमध्ये कविताला फक्त एक पॉइंट मिळवता आला. त्यानंतर मॅचवर तिच्या प्रतिस्पर्ध्याचंच वर्चस्व होतं. धडाधड पॉइंट्स मिळवत तिने कविताचं आव्हान संपवलं. हॉकीत महिला टीमला कास्य पदकाची हूलकावणीहॉकीमध्ये भारतीय महिला टीमला आज पराभवाला सामोरं जावं लागलं. ब्राँझ मेडलसाठीच्या या मॅचमध्ये भारतीय महिला टीमचा मुकाबला जपानशी होता. भारतानं संपूर्ण मॅचमध्ये जपानला जोरदार लढत देत मॅच 0-0 अशी बरोबरीत ठेवली. पण अतिरिक्त वेळामध्ये जपानच्या कैको मानाबेनं गोल्डन गोल करत ब्राँझ मेडलची कमाई केली. दोहा एशियन गेम्समध्ये भारतीय महिला टीमनं ब्राँझ पटकावलं होतं. पण यावेळी त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागणार आहे. मेरीकॉमचा सेमी फायनलमध्ये धक्कादायक पराभववर्ल्ड चॅम्पियन मेरीकॉमला आज सेमी फायनलमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. चीनच्या कॅनकेन रेनने तिचा 11 विरुद्ध सात पॉइंट्सनी पराभव केला. मेरीकॉम नेहमीप्रमाणे आक्रमक खेळत होती. पण त्या नादात तिच्या बचावात त्रुटी राहिल्या. त्याचा फायदा रेनने उचलला. पहिल्याच राऊंडमध्ये मेरीकॉम तीन पॉइंट्सनी पिछाडीवर होती. पण तिने आक्रमक बाणा सोडला नाही. आणि हे अंतर तिने झटपट भरुन काढलं. पण बचावात ती कायम कमी पडली. आणि रेनने पॉइंट्स जमा करत ही मॅच 11-7 ने जिंकली. मेरीकॉमला ब्राँझवर समाधान मानावं लागलं.पदक तालिकादेशगोल्डसिल्व्हरब्राँझएकुणचीन1729286350कोरिया715981211जपान366674176भारत07132646

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 03:07 PM IST

भारतीय स्कॉश टीमला ब्राँझ मेडल

24 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेतभारताच्या खात्यात एका ब्राँझ मेडलची भर पडली. महिलांच्या स्कॉश टीमने टीम प्रकारात ब्राँझ मेडल जिंकलं. सेमी फायनलमध्ये मलेशियाने भारतीय टीमचा 2-0 ने पराभव केला. त्यामुळे भारताला ब्राँझवर समाधान मानावं लागलं. अनाका आणि ज्योत्स्ना चिलप्पन या दोघींनी आपल्या सिंगल्सच्या मॅच सरळ गेममध्ये गमावल्या. पुरुषांच्या टीमलाही ब्राँझवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 2-0 ने पराभव केला. सिद्धार्थ सुचडे आणि सौरव घोशाल यांना आपली मॅच जिंकता आली नाही.

तिरंदाजीत तरुणदीपला सिल्व्हर मेडल

तिरंदाजीत भारताच्या तरुणदीप रायने सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. फायनलमध्ये कोरियाच्या वूजीन किमने त्याचा 7-3 ने पराभव केला. फायनल मॅचमध्ये तरुणदीपने चांगली सुरुवात केली होती. आणि पहिल्या तीन सेटमध्ये दोघंही बरोबरीत होते. पण त्यानंतर तरुणदीपकडून काही चुका झाल्या. याउलट प्रतिस्पर्धी वूजीन किम 10 पैकी दहा पॉइंट्स मिळवत होता. त्यामुळे तरुणदीपचं दडपण वाढलं. आणि शेवटचे दोन सेट त्याने गमावले. पण त्यापूर्वी सेमी फायनलपर्यंत मात्र त्याची कामगिरी अप्रतिम झाली. आणि त्याच्यापेक्षा सीनिअर तिरंदाजांचं आव्हान मोडून काढत त्याने मेडल पक्कं केलं. भारताचा युवा तिरंदाज राहुल बॅनर्जीचं आव्हान मात्र सेमी फायनलपूर्वीच संपुष्टात आलं.

बॉक्सर्सची संमिश्र कामगिरी

भारतीय बॉक्सर्ससाठी आजचा दिवस संमिश्र होता. 81 किलो वजनी गटात दिनेश कुमारनं फायनल गाठली. सेमी फायनल मॅचमध्ये नेपाळच्या दीपक महाराजनचा त्यानं 7-1 ने पराभव केला. मॅच कमालीची एकतर्फी झाली. आणि सुरुवातीपासूनच दिनेशने आघाडी घेतली होती. दिनेशच्या सहा फुटी उंचीचाही त्याला फायदा झाला. आता फायनलमध्ये दिनेशची गाठ उझबेकिस्तानच्या रसुलोव्हशी पडेल.

दिनेशपाठोपाठ पुरुषांच्या साठ किलो गटात विकास कृष्णननं फायनल गाठली आहे. त्यामुळे भारताचं निदान सिल्व्हर मेडल पक्कं झालं. सेमी फायनलमध्ये विकासनं उझबेकिस्तानच्या हर्शिद तोजिबाएवचा 7-0 ने धुव्वा उडवला. विकासने शांतपणे खेळत हा विजय मिळवला. पहिल्यापासून त्याचं मॅचवर नियंत्रण होतं. आणि हुशारीने पॉइंट्स मिळवत त्याने मॅच जिंकली. आणि फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे 64 किलो वजनी गटात भारताच्या संतोष कुमारनंही फायनलमध्ये प्रवेश केला.त्यानं थायलंडच्या मासुक वुट्टीचायचा 5-1 असा सहज पराभव केला.

सुरंजय सिंगला मात्र ब्राँझ मेडल

एशियन चॅम्पियन सुरंजय सिंगला मात्र ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनलमध्ये सुरंजयचा मुकाबला चीनच्या याँग चँगशी होता . चँगने सुरुवातीलाच तीन पॉइंट्सची आघाडी मिळवली. पण सुरंजयही त्याला चांगली लढत देत होता. आणि म्हणता म्हणता त्याने बरोबरी साधली. दुसरा आणि तिसरा राऊंड अटीतटीचा झाला. दोघंही आक्रमक होते. आणि बरोबरीने पॉइंट्स मिळवत होते. पण अखेर याँग चँगला एका पॉइंटची आघाडी मिळाली. आणि ही रंगतदार मॅच 6-5 ने जिंकत फायनलही गाठली.

परमजीतचा सेमी फायनलमध्ये पराभव

भारताच्या परमजीत समोटालाही सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. 91किलो वजनी गटात परमजीतला चीनच्या झेले झँगने 15-3 असं सहज हरवलं.परमजीतकडून भारताला मोठी अपेक्षा होती. पण वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल विजेत्या झँगने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत समोटाला संधी दिली नाही. परमजीतला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं.

महिला बॉक्सिंगमध्ये कविताला ब्राँझ मेडल

महिला बॉक्सिंगमध्ये कविता गोयतलाही ब्राँझ मेडल मिळालं. 75 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये चीनच्या झिंजी ली ने तिचा 5-1 ने पराभव केला. पहिल्या राऊंडमध्ये कविताला फक्त एक पॉइंट मिळवता आला. त्यानंतर मॅचवर तिच्या प्रतिस्पर्ध्याचंच वर्चस्व होतं. धडाधड पॉइंट्स मिळवत तिने कविताचं आव्हान संपवलं.

हॉकीत महिला टीमला कास्य पदकाची हूलकावणी

हॉकीमध्ये भारतीय महिला टीमला आज पराभवाला सामोरं जावं लागलं. ब्राँझ मेडलसाठीच्या या मॅचमध्ये भारतीय महिला टीमचा मुकाबला जपानशी होता. भारतानं संपूर्ण मॅचमध्ये जपानला जोरदार लढत देत मॅच 0-0 अशी बरोबरीत ठेवली. पण अतिरिक्त वेळामध्ये जपानच्या कैको मानाबेनं गोल्डन गोल करत ब्राँझ मेडलची कमाई केली. दोहा एशियन गेम्समध्ये भारतीय महिला टीमनं ब्राँझ पटकावलं होतं. पण यावेळी त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागणार आहे.

मेरीकॉमचा सेमी फायनलमध्ये धक्कादायक पराभव

वर्ल्ड चॅम्पियन मेरीकॉमला आज सेमी फायनलमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. चीनच्या कॅनकेन रेनने तिचा 11 विरुद्ध सात पॉइंट्सनी पराभव केला. मेरीकॉम नेहमीप्रमाणे आक्रमक खेळत होती. पण त्या नादात तिच्या बचावात त्रुटी राहिल्या. त्याचा फायदा रेनने उचलला. पहिल्याच राऊंडमध्ये मेरीकॉम तीन पॉइंट्सनी पिछाडीवर होती. पण तिने आक्रमक बाणा सोडला नाही. आणि हे अंतर तिने झटपट भरुन काढलं. पण बचावात ती कायम कमी पडली. आणि रेनने पॉइंट्स जमा करत ही मॅच 11-7 ने जिंकली. मेरीकॉमला ब्राँझवर समाधान मानावं लागलं.

पदक तालिका

देशगोल्डसिल्व्हरब्राँझएकुणचीन1729286350कोरिया715981211जपान366674176भारत07132646

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close