S M L

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी किरण कुमार रेड्डी

24 नोव्हेंबरआंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून किरण रेड्डी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिल्लीहून आलेल्या पक्ष निरिक्षकांनी आमदारांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रेड्डी हे सध्या आंध्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अंतर्गत राजकारणामुळे बेजार झालेल्या रोसय्या यांनी बुधवारी राजीनामा दिला होता. तेलंगणाचं राजकारण आणि जगन रेड्डींनी केलेलं बंड हाताळण्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यामुळंही काँग्रेस हायकमांड त्यांच्यावर नाराज होती. गुरुवारी रेड्डी यांचा शपथ विधी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 06:07 PM IST

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी किरण कुमार रेड्डी

24 नोव्हेंबर

आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून किरण रेड्डी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिल्लीहून आलेल्या पक्ष निरिक्षकांनी आमदारांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रेड्डी हे सध्या आंध्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अंतर्गत राजकारणामुळे बेजार झालेल्या रोसय्या यांनी बुधवारी राजीनामा दिला होता. तेलंगणाचं राजकारण आणि जगन रेड्डींनी केलेलं बंड हाताळण्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यामुळंही काँग्रेस हायकमांड त्यांच्यावर नाराज होती. गुरुवारी रेड्डी यांचा शपथ विधी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close