S M L

कर्ज घोटाळ्यामुळे शेअर बाजारात 300 अंशांची घट

25 नोव्हेंबरसीबीआयनं काल(बुधवारी) एक कर्ज महाघोटाळा उघड केला. देशातल्या सार्वजनिक क्षेत्रात कर्जवाटप करणार्‍या संस्थांमधल्या उच्चपदस्थ आठ अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. बड्या रियल इस्टेट डेव्हलपर्सना कर्ज देण्यात आली. कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करताच कर्ज मंजूर करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयनं एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे सीईओ रामचंद्रन नायर यांच्यासह बँक ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर आणि आठ अधिकार्‍यांना अटक केली. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. याप्रकरणी 5 केसेस दाखल करण्यात आल्या आहे. कर्ज देण्यात आलेल्या रियल इस्टेट डेव्हलपर्सवरही कारवाई करण्यात येईल असं सीबीआयनं स्पष्ट केले आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर मार्केटमध्ये 300 अंशांची घट झाली. बँक स्टॉक इंडेक्समध्येही 5 ते 18 अंशांची घसरण झाली. एलआयसी हाऊसिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची घट झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 12:20 PM IST

कर्ज घोटाळ्यामुळे शेअर बाजारात 300 अंशांची घट

25 नोव्हेंबर

सीबीआयनं काल(बुधवारी) एक कर्ज महाघोटाळा उघड केला. देशातल्या सार्वजनिक क्षेत्रात कर्जवाटप करणार्‍या संस्थांमधल्या उच्चपदस्थ आठ अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. बड्या रियल इस्टेट डेव्हलपर्सना कर्ज देण्यात आली. कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करताच कर्ज मंजूर करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयनं एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे सीईओ रामचंद्रन नायर यांच्यासह बँक ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर आणि आठ अधिकार्‍यांना अटक केली. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. याप्रकरणी 5 केसेस दाखल करण्यात आल्या आहे. कर्ज देण्यात आलेल्या रियल इस्टेट डेव्हलपर्सवरही कारवाई करण्यात येईल असं सीबीआयनं स्पष्ट केले आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर मार्केटमध्ये 300 अंशांची घट झाली. बँक स्टॉक इंडेक्समध्येही 5 ते 18 अंशांची घसरण झाली. एलआयसी हाऊसिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची घट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close