S M L

सीलबंद पाणी महागणार

31 ऑक्टोबर, मुंबईघराबाहेर पडल्यावर स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळावं, म्हणून अनेक जण मिनरल वॉटरवर विश्वास ठेवतात. पण आता मिनरल वॉटरच पिणार असा हट्ट असेल तर जास्त पैसे मोजावे लागतील. कारण बिसलेरीसह काही कंपन्यांनी त्यांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई दर आकड्यांमध्ये कमी होताना दिसतोय मात्र सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ अजुनही तेवढीच वाढते आहे. पॅकेज मिनरल वॉटर विकणार्‍या बिसलेरी कंपनीनं त्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याआधीही एक रुपयानं दर वाढवले होते. गेल्या काही महिन्यात उत्पादन खर्च विशेषत: पॅकेजिंगवर 20 ते 30 टक्क्यांनी खर्च वाढल्यामुळे दरवाढ करावी लागते, असं कंपनीचं म्हणणं आहे.आता बिसलेरीच्या एका बॉटलसाठी मुंबईत 13 रुपये तर गोव्यात 14 रुपये द्यावे लागतील. थोड्याच दिवसात देशभरात हे दर 14 रुपये केले जातील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. फक्त बिसलेरीच नाही तर कोकाकोला कंपनीही त्यांच्या ' किनले ' या मिनरल वॉटरचे दर वाढवणार असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. प्रतिस्पर्धी पेप्सिको कंपनीनं त्यांच्या ' अ‍ॅक्वाफिना ' चे दर वाढवण्याबाबत काही सूचना दिलेली नाही पण किमती नक्कीच उतरणार नाहीत , असं कंपनीनं सांगितलं. देशात सीलबंद मार्केट सुमारे 1500 कोटींचं आहे. या मार्केटमध्ये दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ होतेय आणि त्यात छोट्या स्थानिक कंपन्याचीच अधिक भर पडत आहे. पण मोठ्या कंपन्यांनी दर वाढवल्यावर छोट्या कंपन्यांही त्याच मार्गावर चालतील, अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 11:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close