S M L

लवासाचं काम तातडीनं बंद करा !

26 नोव्हेंबरपुण्यातल्या लवासा सिटी प्रकल्पाला आज पहिला मोठा धक्का बसलाय. ग्रीन सिटी म्हणून उभारल्या जाणा-या या वसाहतीला आज पर्यावरण मंत्रालयानेच काम थांबवण्याची नोटीस पाठवली आहे. प्रथम दर्शनी कायद्याचं उल्लंघन झाल्यानं ही नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा वेळ देण्यात आलाय. जनआंदोलनांचा समन्वय या संस्थेच्या वतीने मेधा पाटकर आणि प्रकाश आंबेडकरांनी तीन दिवसांपूर्वीच जयराम रमेश यांची भेट घेतली होती. या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहेत.पर्यावरण मंत्रालयाची नोटीस- 2004 साली लवासा प्रकल्पाचे केवळ 5 टक्के काम झाले असतानाच पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं- 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या लवासा प्रकल्पाला केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाच्या परवागीची आवश्यकता होती- पहिल्या टप्प्याच्या आराखड्यात करण्यात आलेले बदल परवानगी शिवाय करण्यात आलेले आहेतया नोटिशीला पंधरा दिवसांत उत्तर देणं लवासासाठी बंधनकारक आहे. आणि तोवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिलेत. मेधा पाटकर यांनी या नोटीशीचं स्वागत केलं असून आता तरी पूर्ण लवासा प्रकल्पाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 04:59 PM IST

लवासाचं काम तातडीनं बंद करा !

26 नोव्हेंबर

पुण्यातल्या लवासा सिटी प्रकल्पाला आज पहिला मोठा धक्का बसलाय. ग्रीन सिटी म्हणून उभारल्या जाणा-या या वसाहतीला आज पर्यावरण मंत्रालयानेच काम थांबवण्याची नोटीस पाठवली आहे. प्रथम दर्शनी कायद्याचं उल्लंघन झाल्यानं ही नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा वेळ देण्यात आलाय. जनआंदोलनांचा समन्वय या संस्थेच्या वतीने मेधा पाटकर आणि प्रकाश आंबेडकरांनी तीन दिवसांपूर्वीच जयराम रमेश यांची भेट घेतली होती. या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहेत.

पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

- 2004 साली लवासा प्रकल्पाचे केवळ 5 टक्के काम झाले असतानाच पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं- 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या लवासा प्रकल्पाला केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाच्या परवागीची आवश्यकता होती- पहिल्या टप्प्याच्या आराखड्यात करण्यात आलेले बदल परवानगी शिवाय करण्यात आलेले आहेत

या नोटिशीला पंधरा दिवसांत उत्तर देणं लवासासाठी बंधनकारक आहे. आणि तोवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिलेत. मेधा पाटकर यांनी या नोटीशीचं स्वागत केलं असून आता तरी पूर्ण लवासा प्रकल्पाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close