S M L

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता

28 नोव्हेंबरजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला अखेर पर्यावरण मंत्रालयानं हिरवा झेंडा दाखवला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी ही घोषणा केली. 35 अटींसह जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ही परवानगी मिळाली आहे. यावेळी विकासाच्या नावाखाली जंगलं आणि नद्या नष्ट होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल, अशी हमीही जयराम रमेश यांनी दिली. प्रकल्प उभारताना पर्यावरणाच्या अटींचं पालन होतं की नाही, हे पाहण्यासाठी एका निगराणी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. या समितीत बीएनएचएस फिशरी कॉलेज रत्नागिरी आणि बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. जैतापूर प्रकल्प- जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी योजना - येत्या वर्षभरात BNHS, वन्यजीव विभागाच्या मदतीनं योजना पूर्ण करणार - NPCIL घेणार पर्यावरणाची काळजी - मासेमारीवर प्रकल्पाचा परिणाम होणार नाही - बागायतदारांना त्रास न होण्याची काळजी- कुलींग वॉटरचं खोल समुद्रात म्हणजे 2.2 किलो मीटर आत डिस्जार्ज करावं- प्रकल्पाच्या पाण्याचं तापमान 5 डीग्री सेल्सियसपेक्षा जास्त नसावं - जमिनीतलं पाणी प्रकल्पासाठी वापरू नये - रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवावी- खारफुटीचं संरक्षण करणं गरजेचं - प्रकल्पाचा आवाज 75 डेसिबलपेक्षा जास्त नसावंहा प्रकल्प नेमका कसा असणार 1.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्सची 'अरेवा' कंपनी 1650 मेगावॅटचे दोन रिऍक्टर उभारणार 2. एकूण 9 हजार 900 मेगावॅट वीजनिर्मितीचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय.3. पहिला टप्पा 2017-2018मध्ये पूर्ण करण्याचं उद्दीष्टया प्रकल्पासाठी - चार गावांमधली 938 हेक्टर जमीन लागणार आहे- ही जमीन 2 हजार 880 शेतकर्‍यांची आहे- 80 शेतकर्‍यांनी जमिनीचा मोबदला आतापर्यंत स्वीकारलाय- तर उर्वरित 2800 शेतकर्‍यांचा विरोध अजूनही कायम आहे- मच्छीमार आणि पर्यावरणवाद्यांचाही विरोध- अणुऊ'र्जेला विरोध करणार्‍या 'नाम' या संघटनेचा या प्रकल्पाला विरोध- देशभरातील पर्यावरणवादी संघटनांचाही विरोध- सरकारने जमीन संपादनाची कारवाई या अगोदरच पूर्ण केली

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2010 11:48 AM IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता

28 नोव्हेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला अखेर पर्यावरण मंत्रालयानं हिरवा झेंडा दाखवला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी ही घोषणा केली. 35 अटींसह जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ही परवानगी मिळाली आहे. यावेळी विकासाच्या नावाखाली जंगलं आणि नद्या नष्ट होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल, अशी हमीही जयराम रमेश यांनी दिली. प्रकल्प उभारताना पर्यावरणाच्या अटींचं पालन होतं की नाही, हे पाहण्यासाठी एका निगराणी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. या समितीत बीएनएचएस फिशरी कॉलेज रत्नागिरी आणि बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे.

जैतापूर प्रकल्प

- जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी योजना - येत्या वर्षभरात BNHS, वन्यजीव विभागाच्या मदतीनं योजना पूर्ण करणार - NPCIL घेणार पर्यावरणाची काळजी - मासेमारीवर प्रकल्पाचा परिणाम होणार नाही - बागायतदारांना त्रास न होण्याची काळजी- कुलींग वॉटरचं खोल समुद्रात म्हणजे 2.2 किलो मीटर आत डिस्जार्ज करावं- प्रकल्पाच्या पाण्याचं तापमान 5 डीग्री सेल्सियसपेक्षा जास्त नसावं - जमिनीतलं पाणी प्रकल्पासाठी वापरू नये - रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवावी- खारफुटीचं संरक्षण करणं गरजेचं - प्रकल्पाचा आवाज 75 डेसिबलपेक्षा जास्त नसावं

हा प्रकल्प नेमका कसा असणार

1.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्सची 'अरेवा' कंपनी 1650 मेगावॅटचे दोन रिऍक्टर उभारणार 2. एकूण 9 हजार 900 मेगावॅट वीजनिर्मितीचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय.3. पहिला टप्पा 2017-2018मध्ये पूर्ण करण्याचं उद्दीष्ट

या प्रकल्पासाठी

- चार गावांमधली 938 हेक्टर जमीन लागणार आहे- ही जमीन 2 हजार 880 शेतकर्‍यांची आहे- 80 शेतकर्‍यांनी जमिनीचा मोबदला आतापर्यंत स्वीकारलाय- तर उर्वरित 2800 शेतकर्‍यांचा विरोध अजूनही कायम आहे- मच्छीमार आणि पर्यावरणवाद्यांचाही विरोध- अणुऊ'र्जेला विरोध करणार्‍या 'नाम' या संघटनेचा या प्रकल्पाला विरोध- देशभरातील पर्यावरणवादी संघटनांचाही विरोध- सरकारने जमीन संपादनाची कारवाई या अगोदरच पूर्ण केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2010 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close