S M L

आंध्रात जगनमोहन रेड्डीचा काँग्रेसवर पलटवार

29 नोव्हेंबरआंध्र प्रदेशात काँग्रेसला जोरदार हादरा बसला आहे. काँग्रेसचे बंडखोर खासदार जगनमोहन रेड्डी यांनी खासदारकी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांच्या आई आणि दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस.आर यांच्या पत्नी विजयालक्ष्मी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. जगनमोहन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडं पाठवला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. आज तो त्यांनी जाहीर केला. त्यांच्याबरोबर इतर 12 समर्थक आमदारही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आंध्र काँग्रेसमध्ये फुट पडण्याची शक्यता आहे. वाय.एस.आर यांच्या अपघाती निधनानंतर जगनमोहन यांनी मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकला होता. पण काँग्रेस हायकमांडनं त्यांना पदापासून दूरच ठेवलं. नाराज झालेल्या जगन यांनी काँग्रेस हायकमांडला आव्हान देत ओडिरपू यात्रा काढली हेती. त्यानंतर यांच्या मालकीच्या साक्षी या चॅनेलवरून सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळलं. जगनमोहन यांचा प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसने रोसय्या यांची मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडी करत किरण कुमार रेडड्ी यांना मुख्यमंत्रीपदी नेमलं. दोनच दिवसांपूर्वी पक्षाचा शिस्तभंग केल्याचा आरोपही जगनमोहन यांच्यावर करण्यात आला होता.आता जगनमोहन स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचं वृत्त आहे. जगनमोहन यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 5 पानाचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. काँग्रेस पक्षांन माझ्या विरोधात राजकारण केलं, असा आरोप या पत्रात जगनमोहन रेड्डी यांनी केला.काय म्हणतात जगनमोहन रेड्डी..* गेल्या 14 महिन्यांपासून काँग्रेस कार्यसमितीनं माझा सतत अपमान केला* काँग्रेस हायकमांडनं सन्मानानं वागवलं नाही* ओडारपू (सांत्वना यात्रा) यात्रा काढण्यापासून पक्षानं मला रोखलं * साक्षी टीव्ही स्वतंत्र मीडिया हाऊस असूनही मला हेतूपरस्पर टार्गेट करण्यात आलं * माझ्या वडिलांच्या वारसावर इतरांनीच आक्रमण केलं* पक्ष सोडतांना मला अतिशय दु:ख होतंय, पण माझ्यापुढे काही पर्याय शिल्लक नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 09:26 AM IST

आंध्रात जगनमोहन रेड्डीचा काँग्रेसवर पलटवार

29 नोव्हेंबर

आंध्र प्रदेशात काँग्रेसला जोरदार हादरा बसला आहे. काँग्रेसचे बंडखोर खासदार जगनमोहन रेड्डी यांनी खासदारकी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांच्या आई आणि दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस.आर यांच्या पत्नी विजयालक्ष्मी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. जगनमोहन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडं पाठवला आहे.

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. आज तो त्यांनी जाहीर केला. त्यांच्याबरोबर इतर 12 समर्थक आमदारही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आंध्र काँग्रेसमध्ये फुट पडण्याची शक्यता आहे. वाय.एस.आर यांच्या अपघाती निधनानंतर जगनमोहन यांनी मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकला होता. पण काँग्रेस हायकमांडनं त्यांना पदापासून दूरच ठेवलं. नाराज झालेल्या जगन यांनी काँग्रेस हायकमांडला आव्हान देत ओडिरपू यात्रा काढली हेती.

त्यानंतर यांच्या मालकीच्या साक्षी या चॅनेलवरून सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळलं. जगनमोहन यांचा प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसने रोसय्या यांची मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडी करत किरण कुमार रेडड्ी यांना मुख्यमंत्रीपदी नेमलं. दोनच दिवसांपूर्वी पक्षाचा शिस्तभंग केल्याचा आरोपही जगनमोहन यांच्यावर करण्यात आला होता.आता जगनमोहन स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचं वृत्त आहे. जगनमोहन यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 5 पानाचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. काँग्रेस पक्षांन माझ्या विरोधात राजकारण केलं, असा आरोप या पत्रात जगनमोहन रेड्डी यांनी केला.

काय म्हणतात जगनमोहन रेड्डी..

* गेल्या 14 महिन्यांपासून काँग्रेस कार्यसमितीनं माझा सतत अपमान केला* काँग्रेस हायकमांडनं सन्मानानं वागवलं नाही* ओडारपू (सांत्वना यात्रा) यात्रा काढण्यापासून पक्षानं मला रोखलं * साक्षी टीव्ही स्वतंत्र मीडिया हाऊस असूनही मला हेतूपरस्पर टार्गेट करण्यात आलं * माझ्या वडिलांच्या वारसावर इतरांनीच आक्रमण केलं* पक्ष सोडतांना मला अतिशय दु:ख होतंय, पण माझ्यापुढे काही पर्याय शिल्लक नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close