S M L

आता कर्नाटकात कन्नड पाट्यांसाठी सक्ती

31 ऑक्टोबर, बंगळुरूदीपा बालकृष्णनराज ठाकरेंनी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा उचलला आणि गदारोळ सुरू झाला. आता या प्रांतवादानं कर्नाटकातही उचल खाल्ली आहे. मात्र तिथं कर्नाटक सरकारनंच कन्नड भाषेचा आग्रह धरला आहे. दुकानदारांनी दोन महिन्यात दुकानांवर कन्नड भाषेतील पाट्या लावाव्यात, असा आदेश राज्य सरकारनं दिला आहे. राज्याच्या 53 वा स्थापना दिवस साजरा करणार्‍या कर्नाटक सरकारनं एक अध्यादेश काढला आहे. त्यात सगळ्या दुकानदार, व्यापारी संस्था आणि कंपन्यांनी त्यांच्या नावाच्या पाट्या कन्नड भाषेत लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारीपर्यंत पाट्या लावल्या नाहीत तर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाणार आहे.' कन्नड भाषेतला बोर्ड नसेल तर 10 हजार रुपयांचा दंड होईल. दुसर्‍या वेळेसही 10 हजार रुपयेच दंड होईल. तिसर्‍यांदा सापडला तर मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल ', अशी माहिती कर्नाटकचे कामगारमंत्री बच्चे गौडा यांनी दिली.याआधी फक्त 100 रूपये दंड आकारण्यात येत होता. मागील काही महिन्यात दुकानदारांनी कन्नड भाषेत पाट्याही लावल्या. पण आता अक्षरांची लांबी-रुंदीही इंग्रजी अक्षरांएवढीच असावी, अशीही सक्ती करण्यात आली आहे. भाषेच्या सक्तीबाबत मात्र बंगळुरूमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 12:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close