S M L

विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजीं यांची 8 हजार 900 कोटींची देणगी

02 डिसेंबरमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले दिग्गज उद्योगपती अझिम प्रेमजी यांनी उद्योजकांना एक नवा आदर्श घालून दिला. त्यांच्या विप्रो या कंपनीचे तब्बल 8 हजार 900 कोटी रुपये किंमतीचे शेअर्स त्यांनी आपल्या एका फाऊंडेशनला दिले आहे. हा पैसा ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.देशातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी आयटी क्षेत्रातले उद्योगपती अझिम प्रेमजी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी 2001 मध्ये त्यांनी अझिम प्रेमजी फाऊंडेशनची स्थापना केली. देशभरातल्या मागास भागातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. या संस्थेला आपल्या विप्रो कंपनीतले 8 हजार 900 कोटी रुपये किंमतीचे शेअर्स त्यांनी दिले.अझिम प्रेमजी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, चांगलं शिक्षण हे समान, मानवतावादी आणि स्थिर समाजाची बांधणी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. भारतातल्या शिक्षणाच्या विकासात योगदान देण्याची आणि त्यातून चांगल्या समाजाची बांधणी करण्याची आमची इच्छा आहे. विप्रोचे संस्थापक प्रेमजी यांची अझिम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा आहे. पुढच्या वर्षी त्याची कार्यवाही सुरू होईल. प्रेमजी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर्स सध्या विप्रोमध्ये आहेत. त्यातले 10.9 टक्के शेअर्स प्रेमझी यांनी आपल्या फाऊंडेशनला दिले.यापूर्वी भारतातल्या इतर अनेक उद्योगपतींनी कल्याणकारी योजनांसाठी देणग्या दिल्या आहे. पण त्यापैकी बहुतेक हार्वड या नावाजलेलया विद्यापीठाला दिल्या आहेत. रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलला 5 कोटी डॉलर्स दिले तर महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीसुद्धा हार्वर्ड विद्यापाठीला 1 कोटी डॉलर्स दिले आहे तसेच नारायण मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या लायब्ररीसाठी 50 लाख डॉलर्स दिले होते.पण या सर्वांपेक्षा अझिम प्रेमजी यांची देणगी विशेष महत्त्वाची आहे. कारण नावाजलेल्या प्रतिष्ठीत संस्थेला देणगी देण्यापेक्षा आपल्याच देशातल्या मागास भागातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचं ध्येय त्यांनी बाळगला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 05:37 PM IST

विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजीं यांची  8 हजार 900 कोटींची देणगी

02 डिसेंबर

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले दिग्गज उद्योगपती अझिम प्रेमजी यांनी उद्योजकांना एक नवा आदर्श घालून दिला. त्यांच्या विप्रो या कंपनीचे तब्बल 8 हजार 900 कोटी रुपये किंमतीचे शेअर्स त्यांनी आपल्या एका फाऊंडेशनला दिले आहे. हा पैसा ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

देशातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी आयटी क्षेत्रातले उद्योगपती अझिम प्रेमजी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी 2001 मध्ये त्यांनी अझिम प्रेमजी फाऊंडेशनची स्थापना केली. देशभरातल्या मागास भागातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. या संस्थेला आपल्या विप्रो कंपनीतले 8 हजार 900 कोटी रुपये किंमतीचे शेअर्स त्यांनी दिले.

अझिम प्रेमजी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, चांगलं शिक्षण हे समान, मानवतावादी आणि स्थिर समाजाची बांधणी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. भारतातल्या शिक्षणाच्या विकासात योगदान देण्याची आणि त्यातून चांगल्या समाजाची बांधणी करण्याची आमची इच्छा आहे.

विप्रोचे संस्थापक प्रेमजी यांची अझिम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा आहे. पुढच्या वर्षी त्याची कार्यवाही सुरू होईल. प्रेमजी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर्स सध्या विप्रोमध्ये आहेत. त्यातले 10.9 टक्के शेअर्स प्रेमझी यांनी आपल्या फाऊंडेशनला दिले.

यापूर्वी भारतातल्या इतर अनेक उद्योगपतींनी कल्याणकारी योजनांसाठी देणग्या दिल्या आहे. पण त्यापैकी बहुतेक हार्वड या नावाजलेलया विद्यापीठाला दिल्या आहेत.

रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलला 5 कोटी डॉलर्स दिले तर महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीसुद्धा हार्वर्ड विद्यापाठीला 1 कोटी डॉलर्स दिले आहे तसेच नारायण मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या लायब्ररीसाठी 50 लाख डॉलर्स दिले होते.

पण या सर्वांपेक्षा अझिम प्रेमजी यांची देणगी विशेष महत्त्वाची आहे. कारण नावाजलेल्या प्रतिष्ठीत संस्थेला देणगी देण्यापेक्षा आपल्याच देशातल्या मागास भागातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचं ध्येय त्यांनी बाळगला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close