S M L

आदर्शशी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा

03 डिसेंबरनागपूर येथे हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, शेतकरी नुकसान, विदर्भ आदी प्रश्नासाठी विरोधाकांनी सत्ताधार्‍यांना घेराव घातला आहे. तर दूसरीकडे आदर्श सोसायटीचा घोटाळाही चांगलाच गाजताना दिसतो.आदर्श सोसायटी घोटाळ्यांशी संबधीत आजी माजी सनदी अधिकार्‍यांकडून राज्य सरकार खुलासा मागवणार आहे. काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यानी या प्रस्तावाला मंजूरी दिली. आय.ए.एस, आय.पी.एस अधिकार्‍यांनी फ्लॅट कशा प्रकारे घेतले आणि त्यांचा उत्पन्नचा स्त्रोत काय या संदर्भात खुलासा मागवण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य सचिव जे पी डांगे यांना काल दिले आहेत. एक ते दोन दिवसांत या अधिकार्‍यांना खुलासा करण्या संबधीचं पत्र जारी केलं जाणार आहे. त्याचबरोबर मुख्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी आणि मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुभाष लाला यांना पदावरुन हटवण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.अवकाळी पावसापाठोपाठ आदर्श घोटाळ्याच्या मुद्द्यावर विरोधकांची बाजू जड होऊ नये यासाठी सरकारनं ही पावलं उचलण्याचं ठरवलेलं दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 11:11 AM IST

आदर्शशी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा

03 डिसेंबर

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, शेतकरी नुकसान, विदर्भ आदी प्रश्नासाठी विरोधाकांनी सत्ताधार्‍यांना घेराव घातला आहे. तर दूसरीकडे आदर्श सोसायटीचा घोटाळाही चांगलाच गाजताना दिसतो.आदर्श सोसायटी घोटाळ्यांशी संबधीत आजी माजी सनदी अधिकार्‍यांकडून राज्य सरकार खुलासा मागवणार आहे. काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यानी या प्रस्तावाला मंजूरी दिली. आय.ए.एस, आय.पी.एस अधिकार्‍यांनी फ्लॅट कशा प्रकारे घेतले आणि त्यांचा उत्पन्नचा स्त्रोत काय या संदर्भात खुलासा मागवण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य सचिव जे पी डांगे यांना काल दिले आहेत. एक ते दोन दिवसांत या अधिकार्‍यांना खुलासा करण्या संबधीचं पत्र जारी केलं जाणार आहे. त्याचबरोबर मुख्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी आणि मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुभाष लाला यांना पदावरुन हटवण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.अवकाळी पावसापाठोपाठ आदर्श घोटाळ्याच्या मुद्द्यावर विरोधकांची बाजू जड होऊ नये यासाठी सरकारनं ही पावलं उचलण्याचं ठरवलेलं दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close