S M L

ज्येष्ठ कवी वामन निंबाळकर यांचं निधन

03 डिसेंबरज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि कवी वामन निंबाळकर यांचं आज (शुक्रवारी) ह्रदयविकारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.नागपूरात त्यांच निधन झालं. आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आयुष्यभर ते पुरोगामी चळवळीत सक्रिय होते. समाज प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. गावकुसाबाहेरील कविता, महायुध्द हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह. तर दलित साहित्य - स्वरूप व कविता, महाकवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साठोत्तर मराठी कवितेतील आंबेडकर दर्शन ही त्यांची इतर काही पुस्तकं गाजली. 'वाहत्या जखमांचा प्रदेश' या त्यांच्या काव्यसंग्रहाला नुकताच राज्य शासनाचा वाड्मय पुरस्कार जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते.वामन निंबाळकर यांच्या निधनाची बातमी आणखी चटका लावून जाते कारण आजच राज्य सरकारतर्फे दिले जाणारे वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात वामन निंबाळकर यांना वाहत्या जखमांचा प्रदेश साठी बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं या पुरस्कारांची निवड केली. यात कवयित्री नीरजा यांना केशवसूत पुरस्कार, प्रज्ञा दया पवार यांना इंदिरा संत पुरस्कार यांचा समावेश आहे. राजन खान, नंदा खरे, अच्युत गोडबोले यांच्या नावाचाही समावेश आहे. अनुवादित लेखन विभागात मीना कर्णिक यांना बिटर चॉकटेल या पुस्तकासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. बालवाङमय विभागात अनिल अवचट यांच्यासह अरुंधती महांबरेंनाही पुरस्कार मिळाला आहे तर संशोधनासाठीचा माडखोलकर पुरस्कार डॉ. प्रकाश खांडगेंच्या 'खंडोबाचं जागरण'ला मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 10:50 AM IST

ज्येष्ठ कवी वामन निंबाळकर यांचं निधन

03 डिसेंबर

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि कवी वामन निंबाळकर यांचं आज (शुक्रवारी) ह्रदयविकारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.नागपूरात त्यांच निधन झालं. आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आयुष्यभर ते पुरोगामी चळवळीत सक्रिय होते. समाज प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. गावकुसाबाहेरील कविता, महायुध्द हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह. तर दलित साहित्य - स्वरूप व कविता, महाकवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साठोत्तर मराठी कवितेतील आंबेडकर दर्शन ही त्यांची इतर काही पुस्तकं गाजली. 'वाहत्या जखमांचा प्रदेश' या त्यांच्या काव्यसंग्रहाला नुकताच राज्य शासनाचा वाड्मय पुरस्कार जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते.

वामन निंबाळकर यांच्या निधनाची बातमी आणखी चटका लावून जाते कारण आजच राज्य सरकारतर्फे दिले जाणारे वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात वामन निंबाळकर यांना वाहत्या जखमांचा प्रदेश साठी बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं या पुरस्कारांची निवड केली.

यात कवयित्री नीरजा यांना केशवसूत पुरस्कार, प्रज्ञा दया पवार यांना इंदिरा संत पुरस्कार यांचा समावेश आहे. राजन खान, नंदा खरे, अच्युत गोडबोले यांच्या नावाचाही समावेश आहे. अनुवादित लेखन विभागात मीना कर्णिक यांना बिटर चॉकटेल या पुस्तकासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. बालवाङमय विभागात अनिल अवचट यांच्यासह अरुंधती महांबरेंनाही पुरस्कार मिळाला आहे तर संशोधनासाठीचा माडखोलकर पुरस्कार डॉ. प्रकाश खांडगेंच्या 'खंडोबाचं जागरण'ला मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close