S M L

जैतापुरात आंदोलनाला हिंसक वळण

04 डिसेंबरजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज माडबन आणि नाटे गावात तीव्र निदर्शनं करण्यात आली. फ़्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांच्या भारतभेटीचा निषेध करीत हजारो आंदोलकांनी प्रकल्पस्थळावर जायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रकल्पाचा निषेधार्थ मच्छीमारांनी आंदोलनात सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलीसांची सुमो गाडीची तोडफोड केली. यावेळी सुमारे 2 हजार आंदोलकांना अटक करण्यात आली. तसेच जिल्हाबंदी आदेश असतानाही वेष बदलून मोर्चात सहभागी झालेल्या वैशाली पाटील तसेच माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, जनहीत सेवा समितिचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनाही अटक करण्यात आली. प्रकल्पाला युतीचा विरोधजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना-भाजपच्या आमदारांनी आज विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली. यामध्ये युतीचे कोकणातले सर्व आमदार सहभागी होते. कोकणातल्या विनाषकारी प्रकल्पाला रोखा आणि इथल्या पर्यावरणाची काळजी घ्या अश्या त्यांच्या मागण्या आहेत. नुकत्याच पर्यावरण खात्याची मंजूरी मिळाललेल्या जैतापूर प्रकल्प रद्द करा आम्हांला पुनर्वसन नको अश्या घोषणा त्यांनी दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 03:01 PM IST

जैतापुरात आंदोलनाला हिंसक वळण

04 डिसेंबर

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज माडबन आणि नाटे गावात तीव्र निदर्शनं करण्यात आली. फ़्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांच्या भारतभेटीचा निषेध करीत हजारो आंदोलकांनी प्रकल्पस्थळावर जायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रकल्पाचा निषेधार्थ मच्छीमारांनी आंदोलनात सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलीसांची सुमो गाडीची तोडफोड केली. यावेळी सुमारे 2 हजार आंदोलकांना अटक करण्यात आली. तसेच जिल्हाबंदी आदेश असतानाही वेष बदलून मोर्चात सहभागी झालेल्या वैशाली पाटील तसेच माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, जनहीत सेवा समितिचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनाही अटक करण्यात आली.

प्रकल्पाला युतीचा विरोध

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना-भाजपच्या आमदारांनी आज विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली. यामध्ये युतीचे कोकणातले सर्व आमदार सहभागी होते. कोकणातल्या विनाषकारी प्रकल्पाला रोखा आणि इथल्या पर्यावरणाची काळजी घ्या अश्या त्यांच्या मागण्या आहेत. नुकत्याच पर्यावरण खात्याची मंजूरी मिळाललेल्या जैतापूर प्रकल्प रद्द करा आम्हांला पुनर्वसन नको अश्या घोषणा त्यांनी दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close