S M L

विमान प्रवासाची भाडेवाढ संबंधात खाजगी कंपन्या आणि सरकारमध्ये चर्चा

04 डिसेंबरविमान प्रवास महागणार की नाही. या प्रश्नावर आज कुठलाही तोडगा निघू शकला नाही. भाडेवाढीच्या प्रस्तावासंदर्भात विमान कंपन्यांच्या मालकांनी आज डीजीसीए अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावर डीजीसीए नं विमान कंपन्यांना दरवाढीबाबत फेरविचार करायला सांगितले. याआधी देशांतर्गत विमानांच्या तिकीट दरांमध्ये 300 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याच्या विमान कंपन्यांच्या प्रस्तावावर नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली होती. डीजीसीए या सरकारी नियंत्रक संस्थेने विमान दर वाजवी असावेत, असं आवाहन खाजगी विमान कंपन्यांना केले. पण किंगफिशरच्या विजय मल्ल्यांनी मात्र या सरकारी हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली. तोडगा न निघाल्यानं अजूनही काही बैठका सरकार आणि विमान कंपन्यांमध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 04:21 PM IST

विमान प्रवासाची भाडेवाढ संबंधात खाजगी कंपन्या आणि सरकारमध्ये चर्चा

04 डिसेंबर

विमान प्रवास महागणार की नाही. या प्रश्नावर आज कुठलाही तोडगा निघू शकला नाही. भाडेवाढीच्या प्रस्तावासंदर्भात विमान कंपन्यांच्या मालकांनी आज डीजीसीए अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावर डीजीसीए नं विमान कंपन्यांना दरवाढीबाबत फेरविचार करायला सांगितले. याआधी देशांतर्गत विमानांच्या तिकीट दरांमध्ये 300 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याच्या विमान कंपन्यांच्या प्रस्तावावर नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली होती. डीजीसीए या सरकारी नियंत्रक संस्थेने विमान दर वाजवी असावेत, असं आवाहन खाजगी विमान कंपन्यांना केले. पण किंगफिशरच्या विजय मल्ल्यांनी मात्र या सरकारी हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली. तोडगा न निघाल्यानं अजूनही काही बैठका सरकार आणि विमान कंपन्यांमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close