S M L

विमान तिकीट दर कमी होणार ?

05 डिसेंबरअव्वाच्या सव्वा दर वाढवणार्‍या खाजगी विमान वाहतूक कंपन्यांना डिजीसीएचा चाप बसला आहे. अखेर विमान भाडे 20 ते 25 टक्के कमी होणार आहे. या भाडेवाढीच्या प्रस्तावासंदर्भात विमान कंपन्यांच्या मालकांनी काल डीजीसीए अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्यावर विमान कंपन्यांना दरवाढीबाबत फेरविचार करायला सांगण्यात आले आहे. त्यानंतर विमान भाडे कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. देशांतर्गत विमानांच्या तिकीट दरांमध्ये 300 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव विमान कंपन्यांनी ठेवला होता. त्यावर नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रवास दर उतरणारदिल्ली- मुंबई :5 ते 10 हजारदिल्ली-चैन्नई :5 ते 15 हजारदिल्ली-हैदराबाद : 5 ते 13 हजारमुंबई-चैन्नई :3 ते 12 हजारमुंबई- बंगळूरू : साडेतीन ते 7 हजारमुंबई-त्रिवेंद्रम : साडेचार ते 16 हजार

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 10:35 AM IST

विमान तिकीट दर कमी होणार ?

05 डिसेंबर

अव्वाच्या सव्वा दर वाढवणार्‍या खाजगी विमान वाहतूक कंपन्यांना डिजीसीएचा चाप बसला आहे. अखेर विमान भाडे 20 ते 25 टक्के कमी होणार आहे. या भाडेवाढीच्या प्रस्तावासंदर्भात विमान कंपन्यांच्या मालकांनी काल डीजीसीए अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्यावर विमान कंपन्यांना दरवाढीबाबत फेरविचार करायला सांगण्यात आले आहे. त्यानंतर विमान भाडे कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. देशांतर्गत विमानांच्या तिकीट दरांमध्ये 300 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव विमान कंपन्यांनी ठेवला होता. त्यावर नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली होती.

प्रवास दर उतरणार

दिल्ली- मुंबई :5 ते 10 हजारदिल्ली-चैन्नई :5 ते 15 हजारदिल्ली-हैदराबाद : 5 ते 13 हजारमुंबई-चैन्नई :3 ते 12 हजारमुंबई- बंगळूरू : साडेतीन ते 7 हजारमुंबई-त्रिवेंद्रम : साडेचार ते 16 हजार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close