S M L

फोटो रजिस्ट्री ऑफिस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश

05 डिसेंबरपुण्याचं फोटो रजिस्ट्री ऑफिस सरकारी अनास्थेचं बळी कसं ठरतंय याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. नागरिकांचे जमीन व्यवहार कागदपत्र, महत्वाचे लँड-रेकॉर्ड्स कसे धूळखात पडलेत तेही आम्ही दाखवलं होतं. या प्रकाराने आता सरकारलाही खडबडून जाग आली. या प्रकरणाची दखल घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल पुण्यात तातडीने अधिकार्‍यांची बैठक बोलावली. ही संपूर्ण डॉक्युमेंट्स महत्त्वाची असून त्याचे जतन करणे आवश्यक आहे त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश त्यांनी दिले. त्याबाबतचा अहवाल तातडीने मागवला जाईल, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 10:57 AM IST

फोटो रजिस्ट्री ऑफिस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश

05 डिसेंबर

पुण्याचं फोटो रजिस्ट्री ऑफिस सरकारी अनास्थेचं बळी कसं ठरतंय याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. नागरिकांचे जमीन व्यवहार कागदपत्र, महत्वाचे लँड-रेकॉर्ड्स कसे धूळखात पडलेत तेही आम्ही दाखवलं होतं. या प्रकाराने आता सरकारलाही खडबडून जाग आली. या प्रकरणाची दखल घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल पुण्यात तातडीने अधिकार्‍यांची बैठक बोलावली. ही संपूर्ण डॉक्युमेंट्स महत्त्वाची असून त्याचे जतन करणे आवश्यक आहे त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश त्यांनी दिले. त्याबाबतचा अहवाल तातडीने मागवला जाईल, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close