S M L

पुणे मॅरेथॉन मध्ये इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व

05 डिसेंबरपुणे मॅरेथॉन आज(रविवारी) मोठ्या उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनवर इथियोपियाच्याच धावपटुंचं वर्चस्व राहील. इथिओपियाचा गुदेता बिराचू पहिला, केनियाचा कॉसमॉस मुटुकू दुसरा तर इथिओपियाचाच तुमीचा व्होर्सा तिसरा आला. पुरुष गटात सहारन दीपचंद हा भारतीयांमध्ये पहिला आला. महिलांमध्ये इथियोपियाची बिर्जाफ टकेले पहिली, चाल्टू मोहा तुरे दुसरी, तर ऍबेबेक बेकेले तिसरी आली. या तिनही धावपटु इथियोपियाच्याच आहेत. 25 देशातील 125 नामवंत खेळाडूंसह 40 हजार धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. 45 लाख रूपयांची बक्षीस विजेत्यांना दिली गेली तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक सहभागी खेळाडूला रौप्यपदकाने गौरवण्यात आले. कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, जलतरणपटू, वीरधवल खाडे यावेळी उपस्थित होते. त्यायाशिवाय आशियाई सुवर्णपदक विजेती सुधासिंग तसेच ललित बाबर हे खेळाडूही स्पर्धेचं आकर्षण ठरले. तर अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि अभिनेत्री समिरा रेड्डीही या सिने कलाकारांनाही आवर्जून उपस्थिती लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 12:10 PM IST

पुणे मॅरेथॉन मध्ये इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व

05 डिसेंबर

पुणे मॅरेथॉन आज(रविवारी) मोठ्या उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनवर इथियोपियाच्याच धावपटुंचं वर्चस्व राहील. इथिओपियाचा गुदेता बिराचू पहिला, केनियाचा कॉसमॉस मुटुकू दुसरा तर इथिओपियाचाच तुमीचा व्होर्सा तिसरा आला. पुरुष गटात सहारन दीपचंद हा भारतीयांमध्ये पहिला आला. महिलांमध्ये इथियोपियाची बिर्जाफ टकेले पहिली, चाल्टू मोहा तुरे दुसरी, तर ऍबेबेक बेकेले तिसरी आली. या तिनही धावपटु इथियोपियाच्याच आहेत. 25 देशातील 125 नामवंत खेळाडूंसह 40 हजार धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. 45 लाख रूपयांची बक्षीस विजेत्यांना दिली गेली तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक सहभागी खेळाडूला रौप्यपदकाने गौरवण्यात आले. कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, जलतरणपटू, वीरधवल खाडे यावेळी उपस्थित होते. त्यायाशिवाय आशियाई सुवर्णपदक विजेती सुधासिंग तसेच ललित बाबर हे खेळाडूही स्पर्धेचं आकर्षण ठरले. तर अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि अभिनेत्री समिरा रेड्डीही या सिने कलाकारांनाही आवर्जून उपस्थिती लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close