S M L

कोची टीम आयपीएल सिझन 4 मध्ये खेळणार

05 डिसेंबरआयपीएल सिझन 4 मध्ये कोची आयपीएल टीम अखेर खेळणार का नाही याबद्दल काही दिवसांपासून शंका व्यक्त केली जात होती. मात्र आयपीएल गवनीर्ंग कौन्सीलची आज मुंबईत महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत कोची टीम आयपीएल सिझन 4 मध्ये खेळणार आहे असा निर्णय घेण्यात आला. कोची टीमला वाचवण्यासाठी टीम मालकांचे आता शेवटचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार शेअरहोल्डींग पॅटर्नमध्ये बदल करण्याची तयारी टीम मालकांनी दाखवली. त्याबाबतची सर्व कागदपत्र बीसीसीआयला त्यांनी गेल्या बैठकीत सादर केली होती. त्यामुळे या बदललेल्या शेअर होल्डींग पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर बीसीसीआयलानं हा निर्णय दिला. कोची टीमच्या या प्रस्तावावर बीसीसीआयने समाधान व्यक्त केले आहे. यामुळे कोची टीम आयपीएल सिझन चार मध्ये अखेर खेळणारे आहे. त्याचबरोबर कोची आणि पुणे टीमला परदेशी खेळाडू निवडण्यासाठी पहिली पसंती दिली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 12:43 PM IST

कोची टीम आयपीएल सिझन 4 मध्ये खेळणार

05 डिसेंबर

आयपीएल सिझन 4 मध्ये कोची आयपीएल टीम अखेर खेळणार का नाही याबद्दल काही दिवसांपासून शंका व्यक्त केली जात होती. मात्र आयपीएल गवनीर्ंग कौन्सीलची आज मुंबईत महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत कोची टीम आयपीएल सिझन 4 मध्ये खेळणार आहे असा निर्णय घेण्यात आला.

कोची टीमला वाचवण्यासाठी टीम मालकांचे आता शेवटचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार शेअरहोल्डींग पॅटर्नमध्ये बदल करण्याची तयारी टीम मालकांनी दाखवली. त्याबाबतची सर्व कागदपत्र बीसीसीआयला त्यांनी गेल्या बैठकीत सादर केली होती. त्यामुळे या बदललेल्या शेअर होल्डींग पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर बीसीसीआयलानं हा निर्णय दिला. कोची टीमच्या या प्रस्तावावर बीसीसीआयने समाधान व्यक्त केले आहे. यामुळे कोची टीम आयपीएल सिझन चार मध्ये अखेर खेळणारे आहे. त्याचबरोबर कोची आणि पुणे टीमला परदेशी खेळाडू निवडण्यासाठी पहिली पसंती दिली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close