S M L

जैतापूर प्रकल्पाला अण्णा हजारेंचा पाठिंबा

06 डिसेंबरजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरण खात्याने परवानगी दिली. तर दूसरीकडे अण्णा हजारेंनी प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचं पुनर्वसन योग्य पध्दतीने करावे ही अट त्यांनी घातली. जर योग्य पध्दतीने पुनर्वसन झाले नाही तर आपण ही आंदोलन करु असा इशारा दिला. सध्या देशाला ऊर्जेची गरज आहे असं सांगत अण्णांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.प्रकल्पाविरोधात शिवसेनाही मैदानातजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आता शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे 12 आमदार जैतापूरमधल्या माडबन गावात दाखल झाले. यासर्व आमदारांनी नाटे गावातल्या मच्छिमारांशी सुमारे 2 तास चर्चा केली. यावेळी शिवसेनेने पहिल्यांदाच प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी भक्कमपणे उभ राहण्याचे जाहीर केले.आणि आंदोलनावरून अटकेत असलेले माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांचीही ते भेट घेणार आहेत. कोळसे पाटील यांनी काल जामीन नाकारला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 09:13 AM IST

जैतापूर प्रकल्पाला अण्णा हजारेंचा पाठिंबा

06 डिसेंबर

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरण खात्याने परवानगी दिली. तर दूसरीकडे अण्णा हजारेंनी प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचं पुनर्वसन योग्य पध्दतीने करावे ही अट त्यांनी घातली. जर योग्य पध्दतीने पुनर्वसन झाले नाही तर आपण ही आंदोलन करु असा इशारा दिला. सध्या देशाला ऊर्जेची गरज आहे असं सांगत अण्णांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.

प्रकल्पाविरोधात शिवसेनाही मैदानात

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आता शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे 12 आमदार जैतापूरमधल्या माडबन गावात दाखल झाले. यासर्व आमदारांनी नाटे गावातल्या मच्छिमारांशी सुमारे 2 तास चर्चा केली. यावेळी शिवसेनेने पहिल्यांदाच प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी भक्कमपणे उभ राहण्याचे जाहीर केले.आणि आंदोलनावरून अटकेत असलेले माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांचीही ते भेट घेणार आहेत. कोळसे पाटील यांनी काल जामीन नाकारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close